नवीन लेखन...

धन्य तो पिता

एक जेमतेम शिकलेला पिता. नांव त्याचं शिवशंकर कोळी. सोलापूर शहरात राहत होते. त्यांना शिवपार्थ नावाचा लहान मुलगा माध्यमिक शाळेत शिकत होता. चुणचुणीत आणि तल्लख बुद्धीचा.खेळाची आवड होती. त्यात तो फुटबॉल खेळण्यात अत्यंत निष्णात. गेल्या काही दिवसापूर्वी शिवपार्थ मैदानात फुटबॉल खेळत होता. रखरखतं ऊन होत. सूर्य आग ओकत होता. खेळता खेळता शिवपार्थ उष्माघाताने कोसळला. उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी, मेंदूला जबर धक्का बसल्याने त्याचे वाचणे कठीण असल्याचे नातेवाईकांना सांगितले. तरीही शेवटचे प्रयत्न म्हणून सोलापूरचे डॉक्टर त्या लहानश्या जीवाला वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते. पण अखेर शिवपार्थला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. खेळायच्या अगोदर ‘ सांग ना आई, मी कसा खेळतो …!’ विचारले  होते. ती धाय मोकलून रडत होती. ममता तडफडत होती. तिचा बाळ रुग्णालयाच्या खाटेवर निजला होता. मोकळं ढाकळ बोलणारा त्यांचा शिवपार्थ त्यांना सोडून गेला होता. त्यामातेची अवस्था कशी झाली असेल. विचार करा. बाप मात्र ती स्थिती बघून हबकला होता. कळवलेले डोळे मूक रडत होते. फक्त चेहर्‍यावर दिसत नव्हते. पण तो बाप त्याचा खोलखोल रुतत चाललेला स्वर दुर्दैवी घटनेचे मनावर प्रहार सहन करीत होता. मुलाच्या सुंदर आठवणींनी मन सैरावैरा धावू लागले होते.

काय केले रे देवा..! म्हणून समस्त नातेवाईक देखील अश्रू ढाळू लागले होते. रुग्णालय गर्दीने भरले होते. कटू वास्तव्याचे हलाहल पूर्णत: पचविले अन दु;खित अ:तकरणाने बाप जागेवरून उठला आणि रडत असलेल्या बाळाच्या आईला म्हणाला. शिवपार्थच्या आठवणी जपायच्या असतील तर आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. त्याने आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय बोलून दाखवला. आईने देखील होकार दर्शविला. डॉक्टरांना निर्णय सांगितला गेला. सोलापूर वैद्यकीय क्षेत्र लगेच कामाला लागले. शिवपार्थचे चार अवयव …. हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंड काढण्यात आली. हृदय हे हवाई मार्गाने पुण्याच्या रुबी हॉस्पिटलला पाठविण्यात आले. एक मूत्रपिंड आणि यकृत रुग्णवाहिकेने पुण्याच्या मंगेशकर आणि नोबेल हॉस्पिटलला पाठविण्यात आले. एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण सोलापुरात अश्विनी हॉस्पिटलमध्ये एका इंजिनिअरींग शिकत असलेल्या विद्यार्थ्यावर करण्यात आले. जो दोन वर्षापासून दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे डायलिसीस वर जीवन कंठत होता.

एक जीव गेल्याचे दु:ख नक्कीच पण त्या जीवामुळे चार जीवांना जीवनदान मिळाले ते केवळ शिवपार्थच्या आई वडिलांनी घेतलेल्या क्रांतीकारी निर्णयामुळे. डॉक्टरांची तत्परता दाखविलीच शिवाय अनेक हात या निर्णयासाठी मदतीला पुढे आले. ते पोलीस असो वा समस्त सोलापुरी माणसं. त्यांना सलाम करायला हात उत्सुक आहेत. एक विचारसरणी बदलणारी ही घटना. त्या मायबापावर अकस्मात ओढवलेल्या संकटाने व्यथित होऊनही  अन्य चार जणांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याचा खरा आकार दिला.

दान ही आपली संस्कृती तर भोग ही प्रकृती. श्रध्देने दिलेले दान किंवा ऐपतीनुसार केलेलं दान. अनेकजण देहाची विटंबना नको म्हणून माघारी परतले असते. असो … शंभरात एक शूर जन्माला येतो. तर सहस्त्रामध्ये एक ज्ञानी असतो. तर दशसहस्त्रामध्ये एक वक्ता निर्माण होतो. पण शिवपार्थच्या वडिलांसारखा  दाता हा क्वचितच लाभतो. दानी म्हटले की, त्या पुरुषाचे हात वर असतात तर याचक याचे हात नेहमीच खाली असतात.

देशात आजच्या घडीला लाखो हृदयरोगी आहेत. पण हृदयदाते प्रमाण अल्प आहे. तर दीड ते दोन लाख मूत्रपिंडाचे रुग्ण आहेत पण केवळ 5000 शस्त्रक्रिया झाल्याचं निदर्शनास आले आहे. यकृतरोगींचा आकडा 30000 असताना केवळ 1000 यकृत रोग्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे आढळून आले आहे. गरजे इतके दाते आज तरी मिळत नाहीत. याचाच अर्थ ज्याच्यावर शस्त्रक्रिया होत नाहीत ते कसेबसे आयुष्य जगत आहेत. वेळ आली की, जगाचा निरोप घेत आहेत. शिवपार्थच्या बाबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मानस नाही. पण त्यांनी दाखविलेले धाडस हे कौतुकास्पद आहे. शिवपार्थच्या देहाचे त्यांनी खरोखर सार्थक केले. त्यासाठी मनापासून त्यांना सलाम करावासा वाटत आहे.

अशोक भेके

घोडपदेव समूह

 

Avatar
About अशोक मारुती भेके 13 Articles
मी लहापणापासून मुंबईतील घोडपदेव या श्रमजीवी भागात राहत असून सध्या मी बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत सेवेला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..