(भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र)
एक भयानक रात्र अशी, सहस्त्रावधींचा घेई बळी ।
नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी ।।
मध्यरात्र होवून गेली, वातावरण शांत होते ।
गादीवरती पडून सारे, स्वप्ने रंगवीत होते ।।
तोच अचानक विषारी वायू, पसरला त्या वातावरणी ।
हालचालींना वाव न देता, श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी ।।
कित्येक जनांचे बळी घेतले, सुलभ रितीने काळाने ।
शांत निद्रेची महा निद्रा, करूनी टाकीली क्षणात त्याने ।।
भरडून गेले सारे परि, पापी वा पुण्यवान ते ।
कळला नाही हिशोब त्याचा, मोजमाप काय असते ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply