राणी वर्मा या माणिक वर्मा यांच्या कन्या. राणी वर्मा यांनी वयाच्या ७ व्या वर्षापासून प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांच्या ‘गीत गोपाळ’ या कार्यक्रमातून प्रथम रंगमंचावर पदार्पण केल्यानंतर त्यांनी अनेक नामवंत गायकांसोबत गाण्याचे कार्यक्रम सादर केले. ‘हे राष्ट्र देवतांचे’, ‘पप्पा सांगा कुणाचे’, ‘गा गीत तू सतारी’, ‘मीरा तुला आळवीते’, ‘तुला आळविता जीवन स्वराचे’, ‘संपले स्वप्न हे’ अशा अनेक सुरेल लोकप्रिय गाण्यातून त्या रसिकांमध्ये लोकप्रिय झाल्या. ‘सूर सिंगार पुरस्कार’, ‘गोल्ड स्पॉट संगीत पुरस्कार’ अशा स्पर्धा तसेच आंतर महाविद्यालयीन संगीत स्पर्धांमधून त्यांनी नेहमीच प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवली. राणी वर्मा यांची लहान मुलांची गाणी असलेले ‘अडम तडम तड तड बाजा’ ही कॅसेट तर आजही मुलांमध्ये लोकप्रिय आहे. ‘सप्तक’ या त्यांच्या ऑर्केस्ट्राचे देश-परदेशात अनेक दौरे करून त्यांनी लोकांना आपल्या मधुर स्वरांनी मंत्रमुग्ध केले. केवळ गायिका म्हणूनच नव्हे तर त्यांनी पहिली ‘महिला ध्वनीमुद्रक’ म्हणूनही मान मिळावला आहे. राणी वर्मा यांनी ‘फॅमिली कट्टा’ चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाउल टाकले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply