अमृता सुभाष कुलकर्णी म्हणजेच अमृता सुभाष हिने चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमात काम करणारी अभिनेत्री आहे, यासोबतच लेखिका, गायिका आणि संगीतकार म्हणून देखील तीने काम केले आहे.. तिचा जन्म १३ मे रोजी झाला. एक प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून अमृता सुभाषची ओळख आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची विद्यार्थीनी असलेल्या अमृताने एनएसडीमध्ये असतानाच अनेक मराठी, हिंदी, जर्मन नाटकांमध्ये काम केले. अमृताला तशी अभिनयाचे आणि संगीताचे बाळकडू तिच्या आईकडून म्हणजेच ज्योती सुभाष यांच्याकडूनच मिळाले. अनेक नाटकांमधील बहारदर भूमिकांमूळे अमृताची एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यात तिला तिच्या ‘ती फुलराणी’ या नाटकातील भूमिकेने अधिक प्रसिद्धी दिली. या नाटकानंतर तिची खरी ओळख निर्माण झाली. त्यानंतर तिने ऑस्कर पुरस्कार नामांकीत ‘श्वास’ या चित्रपटातील भूमिकेने एक वेगळाच ठसा उमटवला. आणि आज ती पठडीबाहेरच्या चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नाटक आणि चित्रपटांबरोरच अमृताला प्रसिद्धी मिळाली ती झी मराठी वाहिनीवरील ‘अवघाची संसार’ या मालिकेतील भूमिकेने…या मालिकेतील भूमिकेने आज तिला घराघरात ऒळखल्या जाते. या मालिके व्यतिरीक्त अमृताने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका केल्या आहेत. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर ब-याच कालावधीने तिचं एक नवीन नाटक नुकतंच येऊन गेलं ते म्हणजे ‘पुनश्च हनीमून’. हे नाटक अतिशय लोकप्रिय झालं. या नाटकाची महत्वाची गोष्ट म्हणजे या नाट्काचं लेखन, दिग्दर्शन तिचा पती संदेश कुलकर्णीने केलं असून यात त्याने मुख्य अभिनेत्याची भूमिका सुद्ध केली आहे. याआधीही या दोघांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply