तेजस्विनी पंडीत ही रणजित पंडित आणि जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची कन्या… तिचा जन्म २३ मे १९८६ रोजी झाला. तेजस्विनी पंडित ने ‘अग बाई अरेच्चा ‘ मधील निगेटिव्ह शेडमधील भूमिकेतून तिने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि त्यानंतर सुरु झालेला तिचा प्रवास जाहिरात, चित्रपट,मालिका,नाटक अशा चारही माध्यमात सुरु आहे. भूमिका ग्लॅमरस असो कि सोज्वळ त्या भूमिकेत शिरून त्यावर आपली छाप पाडण्याचे कसब तिला उत्तम जमलंय. ‘रानभूल’, ‘गैर’ आणि ‘अगबाई अरेच्चा’ या चित्रपटांमध्ये आणि ‘कालाय तस्मै नम:, ‘एकाच या जन्मी’, ‘घर श्रीमंताचं’ अशा टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहचणाऱ्या तेजस्विनी पंडीतला ‘मी सिंधूताई सपकाळ’ मधील भूमिकामुळे तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळाला. तेजस्विनी पंडितने एक अभिनेत्रीची उद्योजिका बनून ‘तेजाज्ञा’ नावाचा साड्यांचा ब्रँड उभा केला आहे. तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे यांच्या ‘तेजाज्ञा’ या ब्रॅण्ड अंतर्गत साड्या तयार करण्यात येतात. ‘एक महिला एक साडी’ अशी त्यांच्या ब्रॅण्डची टॅगलाइन आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply