रात्री आईजवळ झोपण्यावरुन लहान मुलांमधे होणारी भांडणं ही तर प्रत्येक घराची खासियतच आहे. प्रत्येक घरातील मुलांचा आणि आयांचा प्रकार वेगवेगळा असला तरी भांडणं मात्र तीच.
प्रत्येक मुलाला वाटत असतं आईने आपल्याच जवळ झोपावं आणि झोपताना फक्त आपल्याशीच बोलावं. समजा, घरात दोन मुलं असली आणि आई जर दोन मुलांच्या मधे झोपली, तरी प्रत्येक मुलाला वाटतं आईने माझ्याचकडे पाहून बोललं पाहिजे. अशावेळी आईची चिडचिड होते.
काहीवेळा आई थकलेली असते,कंटाळलेली असते पण ह्याची जाणीव मुलांना नसते. आणि मग,मुलांना न आवडणारं एखादं वाक्यं ती नकळत बोलून जाते. ज्यामुळे मुले खोलवर दुखावली जातात. आणि विशेष म्हणजे,ही आपली नाराजी मुले स्पष्टपणे कुणालाच सांगत नाहीत. ह्या प्रकारामुळे मुले शांतपणे,प्रसन्नपणे झोपी न जाता वैतागून,त्रासून किंवा चिडून झोपतात. ह्यामुळे मुलांचे आरोग्य तर बिघडतेच पण त्यांचे मानसिक आरोग्य ही बिघडते!
मुलांना हवा असतो तुमचा स्पर्श,तुमचा सहवास आणि तुमचे आश्वासक चार शब्द! झोपायला जाण्याच्या वेळी,मुलांशी गप्पा मारा. दिवसभरात त्यांनी काय काय केलं? त्यात त्यांना काय आवडलं? काय आवडलं नाही? ह्याची आस्थेने चौकशी करा. त्यांचं बोलणं एखादवेळेस तुमच्या दृष्टीने कंटाळवाणे असेल ही पण कृपया अशावेळी तुमच्या ‘थकलेपणाची’ सबब पुढे करुन मुलाला गप्प करू नका. थोडा त्रास झाला तरी तुमच्या मुलाचं बोलणं ऐकून घ्या. मुलांना तुमच्याशी मोकळेपणाने वागता येईल, बोलता येईल अशी तुमची वागणूक असेल तर मुले आनंदाने झोपी जातात. मुलांचे ‘मित्र पालक’ व्हा.
पालकांसाठी गृहपाठः
पण लक्षात ठेवा,मुलांच्या झोपायच्या वेळी पालकांपैकी एकाचा तरी ‘मैत्रीपूर्ण सहवास’ मुलांना मिळणे अत्यंत गरजेचे आहे.‘मित्र पालकांची मुले मस्त गुरगुरुन झोपतात’ ही चिनी म्हण जागेपणीच आठवा.
पण लक्षात ठेवा,मुलांच्या झोपायच्या वेळी पालकांपैकी एकाचा तरी ‘मैत्रीपूर्ण सहवास’ मुलांना मिळणे अत्यंत गरजेचे आहे.‘मित्र पालकांची मुले मस्त गुरगुरुन झोपतात’ ही चिनी म्हण जागेपणीच आठवा.
— राजीव तांबे
Leave a Reply