लुळा पांगळा बसूनी एकटा, गाई सुंदर गाणे ।
आवाजातील मधूरता, शिकवी त्याला जगणे ।।
जगतो देह कशासाठी, हातपाय असता पांगळे ।
मरण नसता आपले हाती, जगणे हे आले ।।
लुळा असला देह जरी, मन सुदृढ होतेस ।
जगण्यासाठी सदैव त्याला, उभारी देत होते ।।
गीत ऐकता जमे भोवती, रसिक जन सारे ।
नभास भिडता सुरताना, शब्द उमटती वाह ! वा रे ।।
असमान्य ते एकचि मिळता, उणीवतेची खंत कशी ।
दुबळ्या देही कला श्रेष्ठ ती, वीज चमकते रात्री जशी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply