नवीन लेखन...

भारतीय मसाला डब्बा

Indian Masala Dabba

भारतीय कुटुंबाची अख्खी महत्ता, गुण वैशिष्ट्ये या रोजच्या डब्ब्यात ठासून भरलेले आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं वाटणार नाही !

तिखटासारखे …
थोडक्यातंच बस म्हणावेसे वाटणारे..
रंग-रुप-गुणानेच दरारा निर्माण करणारे…
पण नक्कीच हवेहहवेसे वाटणारे
आपले वडील

हळद …
कुठेही जा.. आपली छाप सोडणारी..
रंगात रंगूनी सा-या, रंग माझा हळवा…
मरावे परी रंगापरी उरावे… अशी हवी हवीशी,
आपली आई.

जिरे-मोहरी …
कमी-जास्त प्रमाणात तडतडणारंच… चवीने भांडणारे… म्हणूनच यांच्या, उपास-बिन उपास
अशा सोईस्कर वाटण्या करुन दिलेल्या…
म्हणजे भावंड…

काळा मसाला …
ब-या-वाईट घराणेशाहीच्या गोष्टींचे सुवासिक चुर्ण,
जातील तिथे आदरयुक्त कौतुकास पात्रच ठरतात…
म्हणजे दोन्हीही आजोळ कंपनी…

मेथीचे, उडदाचे दाणे …
हे अधून-मधूनंच बरे असतात, नसतील तर अति परिचयात अवज्ञा ठरलेलीच यांची.
म्हणजे,एके काळचे जवळचे आणि आता जरा दुरावलेले खणखणीत नातलग…

आणि किसून उरलेल्या खोब-याचे तुकडे (काही कुजके पण), भाचरांवर बारीक लक्ष ठेवतात आणि मग खाजगीत पालकांना सल्ले देतात…

अण्णा… लक्ष ठेव बरं…  पोरं याच वयात हातातून निसटतात. त्या जोश्याच्या पोराचं असंच…

म्हणजे छोट्या गावातले काका,मामा लोक.. ह्यांच्या घरी यांचा किस पाडला जातो म्हणून हे आपल्या घरात येतात

त्या कमरेतनंच मोडलेल्या मिरच्या म्हणजे शहरी आत्या आणि मावश्या…
मोडतील पण भाच्यांचे पुरेपूर दिलो जानसे स्कैनिंग करतील… बेबीताई सांभाळ गं पोरीला…
अगं काय तिचं ते नखं वाढवणं, रोज शैम्पु वापरणं, आरश्यात बघणं… उद्या उजवायची आहे तिला.. लोकं लक्ष ठेवून असतात म्हटलं.

आणि सर्वात शेवटी, बडीशेप ….
एकमेकांना असा काय शेप देतील ना की सारी टेन्शन एकदम खल्लास .. म्हणजे मित्रमैत्रिणी

हे सर्व लोकं एकेका वयात एकेकटे जिणं हराम करतील, पण एकत्रीतपणे येऊन जीवही तेवढाच लावतील…

आयुष्याला चटपटीत,घमघमीतही तेच बनवतील.

भारतीय मसाला डब्बा चिरायु होवो !

— संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी  शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.

Avatar
About Guest Author 524 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..