नवीन लेखन...

नशिबावरचा विश्वास

AMOR FATI – नशिबावरचा विश्वास

हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. याचा उच्चार कसा करतात मला माहित नाही. मी आमोर फाटी असा करतोय.
याचा अर्थ आहे “नशिबावरचा विश्वास”.

आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मग ती वाईट असली, नुकसान करणारी असली तरीही ती तशी घडणे आवश्यक होते… अशा दृष्टिकोनातून ती गोष्ट स्विकारणे. ती गोष्ट आवडली नाही तरीही ती स्विकारणे… अगदी झेन तत्वज्ञानात सांगितलेल्या शांततेने, प्रसन्नतेने स्विकारणे.

थाॅमस एडिसन जेवत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला. त्याने वाईट बातमी आणली होती. एडिसनच्या प्रयोगशाळेला आग लागली होती.
एडिसनने त्याला कशी प्रतिसाद दिला असेल असे वाटते?
“अरे देवा, काय हे… माझं नशिबच फुटकं… माझी सगळी मेहनत वाया गेली… ” अशी?
की त्याने खूप चिडून, बिथरून, आरडाओरड केली असेल?
पण यापैकी काहीच घडलं नाही. एडिसनने आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाला “अरे तुझ्या आईला आधी बोलाव, तिला अशी आग परत पहायला मिळणार नाही”
स्वाभाविकपणे मुलाला हेच वाटले की आपल्या बापाचे डोके फिरले, वेडा झाला बाबा. आजवर केलेली सर्व मेहनत आगीत भस्मसात होत होती आणि एडिसन शांत होता. तो शांतपणे म्हणाला “आग लागली हे बर झालं माझ्या सगळ्या चुका आणि इतर अनावश्यक गोष्टी जळून गेल्या.”

आमोर फाटी खऱ्या स्वरुपात स्विकारणे म्हणजे काय, याच हे उदाहरण म्हणता येईल – नशिबात असलेली गोष्ट आनंदाने स्विकारणे.
६७ वर्षांचा एडिसन विमनस्क, हताश, उदास काहीच न होता नव्या उत्साहाने कामाला लागला. आगीत भस्मसात झालेली संपत्ती त्याने दसपटीने परत मिळवली.

मी या आमोर फाटी कल्पनेच्या प्रेमातच पडलोय. का माहितेय? कारण आपलं नशिब स्विकारण्यातली ताकत मला समजलीय. यात अक्षरशः एवढी प्रचंड ताकत आहे की आपल्याला काहीच अशक्य वाटत नाही. प्रत्येक गोष्ट होण्यामागे काही कारण असतं आणि ती गोष्ट सकारात्मकतेने स्विकारणे हे तुमच्या हातात असते.

# कदाचीत तुमचा जाॅब गेला असेल,

# कदाचीत तुमची आयुष्यभराची कमाई कोणी लुबाडली असेल,

# कदाचीत तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तिला असाध्य रोग झाला असेल,

# कदाचीत तुम्हाला कोणी अत्यंत वाईट वागणुक दिली असेल,

# कदाचीत आयुष्याने तुमच्यासमोर असे आव्हान उभे केले असेल ज्यातून तुमची सुटका नाही,

तुम्ही हे सगळं हसत स्विकारता आणि त्यातूनच नव्या उर्जेने पुढे जाता याला आमोर फाटी म्हणतात.

तुमच्या बाबतीत अशा गोष्टी घडल्याच तर तेव्हा तुम्हाला ओके किंवा चांगल वाटावं हा या लेखाचा उद्देश नाही. काहीही घडलं तरी तुम्हाला ते ग्रेट वाटावं आणि तुम्ही ते हसत स्विकारावं हा उद्देश आहे.
जर ते घडलं तर ते घडणारच होतं आणि त्यातून तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्यावा हा आहे.

एखादी आपत्ती आली असतांना शांत रहाणं हे अनैसर्गिक वाटतं.
पण तेव्हा शांत रहा.

जेव्हा आपल्याला हरल्यासारखं वाटेल तेव्हा ते शांत रहाणंच जोमाने प्रवास करण्यासाठी नविन उर्जा देणारं ठरेल…
बास आता, झालं तेवढं खुप झालं अस वाटेल तेव्हा ते शांत रहाणं नवं इंधन देणार ठरेल…
सगळं विपरित घडत असतांना ते शांत रहाणं थिंक बिग सांगणारं ठरेल…
हताशा आली असतांना ते शांत रहाणं तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारं ठरेल…

चला मित्रांनो आमोर फाटी स्विकारुया…

— राम जोशी, अलिबाग
(अनुवाद)


— संकलन : अमित कुलकर्णी
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..

Avatar
About अमित कुळकर्णी 14 Articles
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..