मुळच्या पुण्यातील असलेल्या डॉ.रेवा नातू यांचे वडील पं. विनायक फाटक हे प्रसिद्ध तबलावादक असल्याने त्यांचे संगीत शिक्षण घरातूनच झाले. दत्तोपंत आगाशे, पं. शरद गोखले आणि डॉ. दिग्विजय वैद्य यांच्या कडून त्यांनी संगीताचे शिक्षण केले. त्यांनी काही काळ मा.वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या कडे संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी एसएनडीटी महाविद्यालयातून संगीतात एम.ए व पी.एच.डी केली व प्रथम क्रमांक मिळविला. अखिल भारतीय गांधर्व विद्यालय, पुणे मार्फ़त त्यांनी संगीताचार्य ही पदवी मिळविली. यामध्ये सर्वाधिक गुण मिळवत टी. डी. जानोरकर पुरस्कार आणि ललकारी यांसारख्या नऊ पुरस्कारावर मोहोर उमटविली. रेडियोवर संगीत कलाकार म्हणून त्या कार्यरत आहेत. सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव मध्येही डॉ. रेवा नातू कायम गायन करत असतात. कामगिरी उल्लेखनीय अशी आहे. हसले मनी चांदणे‘ या कार्यक्रमातून प्रसिद्ध गायिका माणिक वर्मा, ज्योत्सना भोळे, किशोरी आमोणकर या दिग्गज गायिकांच्या गायलेली दुर्मिळ गीते डॉ. रेवा नातू सादर करतात. तिन्ही गायिकांच्या आवाजातील नजाकत, रागदारीवरील हुकूमत, त्यांच्या गीतांतील सौंदर्याचे तंतोतंत दर्शन डॉ. रेवा नातू घडवितात. ऑल इंडिया रेडियो मध्ये शास्त्रीय संगीत स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर येऊन राष्ट्रीय शिष्यवृत्ती त्यांनी संपादन केलेली आहे तसेच नेहरू सेंटर, मुम्बई आयोजित भारत डिस्कव्हरी स्पर्धेमध्ये त्या विजेत्या झालेल्या आहेत. विष्णु दिगंबर पलुस्कर पुरस्कार, पं.विनायकबुवा पटवर्धन पुरस्कार, २०१५ चा इंद्रधनु सुधीर फड़के युवोन्मेष पुरस्कार, ललकार पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. डॉ. रेवा नातू यांच्या कान्हा, तराना,गणेश सहस्त्रनाम अशा सी.डी पण प्रकाशित झाल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
डॉ. रेवा नातू यांचे गायन
https://www.youtube.com/watch?v=f7hf5QnYDog
https://www.youtube.com/watch?v=mjvqDGf1Dp4
Leave a Reply