श्रीकांत देशपांडे हे रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांचे नातू होत. त्यांचा जन्म १२ जून १९४८ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. वसंतराव तथा नानासाहेब देशपांडे यांचा सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या आरंभापासून महत्त्वाचा वाटा होता.
श्रीकांत देशपांडे यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण सरस्वतीबाई राणे यांच्याकडून घेतले. त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांच्याकडेही त्यांनी किराणा घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांच्याकडे तालीम घेतली होती. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे ते सहसचिव होते. तसेच या महोत्सवात अनेकदा त्यांनी आपली गायकी सादर केली होती. ते पुणे विद्यापीठाच्या डॉक्टसरेटसाठीच्या (संगीत विषय) प्रवेश समितीवर सन्माननीय सदस्य होते. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी अनेक कार्यक्रम केले होते.
भारतातून अनेक संगीत परिषदांमधून श्रीकांत देशपांडे यांचे गायन झाले. तसेच रागमाला परफॉर्मिग आर्टस् ऑफ कॅनडा आणि इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशनच्या वतीने अमेरिकेसह कॅनडामध्ये त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देशाविदेशात गायनाच्या अनेक मैफली केल्या होत्या. सवाई गंधर्वसंमेलन, तानसेन समारोह, गुणीदास संमेलन, दीनानाथ मंगेशकर संमेलन, सूरश्री केसरबाई संमेलनातही त्यांनी गायनाचे कार्यक्रम केले होते. श्रीकांत देशपांडे यांचे २९ जानेवारी २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply