अभिनेता म्हणून अमरीश पुरी म्हणजे साधेपणा, कामातील वक्तशीरपणा याचा सुंदर मिलाफ, फिल्मी दुनियेत राहूनही ते अतिशय शिस्तबद्ध आणि नातेसंबंध जपणारे दुर्मिळ व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी झाला.
१९७० ते २००५ या काळात अमरीश पुरी यांनी हिंदी भाषेसह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.
भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांनी अनेक चित्रपटांतील विविध पात्रे जिवंत केली.
‘मिस्टर इंडिया‘तील मोगँबो, ‘दामिनी‘मधील चड्ढा, तसेच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे‘, गर्दिश, अर्धसत्य, विरासत आणि अनेक चित्रपटांमधील कडक शिस्तीचे, निष्ठूर वडिलांची पात्रे अविस्मरणीय ठरली. अमरीश पुरी लिखित ‘अॅ क्ट ऑफ लाइफ’ या इंग्रजी आत्मचरित्र प्रस्तुत पुस्तकाचा अनुवाद श्री.चंद्रकांत भोंजाळ यांनी समर्पक अनुवाद करून अमरीश पुरी यांचे जीवनचरित्र मराठी वाचकांसमोर आणले आहे. अमरीश पुरी यांचे २ जानेवारी २००५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply