चिमण्यांची चिव चिव नाही
कावळ्यांची कावं कावं आहे .
पहाटेच्या वाऱ्यालाही
पेट्रोलचा दुर्गंध आहे.
सुकलेल्या नळांना
पाण्याची तहान आहे.
विजेचा झटका बघा
कसा घामाने कासाविस आहे.
कचर्याच्या ढिगार्यावर
डुकरांचा वाद आहे.
डॉक्टरांच्या मदतीला आज
डेंगू आणि मलेरिया आहे.
क्षयग्रस्त फुप्फुसाना
आता
यमराजाचीच वाट आहे.
महागाईच्या माऱ्याने
पिसलेला हा
कामगार आहे.
फालतू बटाटा ही आता
ग्राहकाला महाग आहे.
गालिब तुझी दिल्ली आता
जगायला लाचार आहे.
— विवेक पटाईत
Leave a Reply