हस्तिनापुरात लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. पांडव आघाडीचे नेतेपद धर्मराजाकडे होते तर कौरव आघाडीचे नेतेपद दुर्योधनाकडे होते. पांडव आघाडीचा मातबर नेता अर्जुन दूरदर्शन वर दुर्योधानेच्या सभेत जमलेली लाखंची भीड पाहून संभ्रमात पडला. विश्वासू कार्यकर्त्यान कडून त्याला कळले
होते ‘साहेब या वेळी काही खर नाही’. निवडणूक हरलो तर भारीच बदनामी होणार व मंत्रीपद जाणार. नौकर चाकरांची फौज, सरकारी बंगला व लाल दिवेवाली गाडी पण जाणार. सुभद्रेला तर लाल दिव्यावल्या गाडीत बसायची भारीच हौस. आता काय करावे? निवडणूक लढवावी कि माघार घ्यावी? किंवा शेवट पर्यंत प्रयत्न करावा? काहीही ठरवण्याचा आधी कृष्णाचा सल्ला घ्यायला पाहिजे हा त्याने निश्चय केला.कृष्ण द्वारकेचा मुख्यमंत्री होता. द्वारका जम्बुद्विपातील सर्वात श्रीमंत राज्य होत. एका गुराख्याचा पोरा पासून कृष्ण या पदावर पोहचला होता. आपल्या राजनीतिक कारगर्दीत त्याने मोठ्या- मोठ्या नेत्यांना धूळ चाटविली होती. प्रतिकूल परिस्थितीही आपल मुख्यमंत्रीपद कायम ठेवलं होत. कोणालाही ‘रंका पासून राजा बनवू शकतो ही कृष्णाची ख्याती होती. लोक प्रेमाने त्याला राजनितीताला ‘योगीराज’ म्हणत. कृष्ण आपल्याला अवश्य
अर्जुन म्हणाला ” हे योगीराज, मी संभ्रमात आहे. काय कराव हे सुचत नाही. कृष्ण वदला” अर्जुना तुझा मजवर विश्वास असेल तर तुझा संभ्रम मी आताच दूर करतो? पण एक सांग, पांडव जिंकले तर प्रधान मंत्री कोण बनेल? तुला काय मिळेल? अर्जुन ” धर्मराज प्रधान मंत्री बनेल. मला मंत्री पद मिळेल. “आणि कौरव जिंकले तर”?दुर्योधन प्रधान मंत्री बनेल? आणि
आम्हाला विपक्षात बसावे लागेल. ‘ही मुख्य समस्या आहे तर’ कृष्ण हसत म्हणाला, पण चिंता नको करू तू माझा मित्र व मेहुणा आहे तुझी गादी कायम राहील.अर्जुनाला कृष्णाच्या बोलण्याचा रोख कळला, निवडणुकीच्या वेळी धर्मराजाची दगाबाजी ! जमणार नाही. लोक काय म्हणतील. दुर्योधनाला शरण जाऊन त्याचा दरबारात हात बांधून उभे राहण ! छे छे कल्पना करवत नाही. शिवाय हा अधर्म आहे. अर्जुन नेहमी धर्माच्या मार्गावर चालत राहिला आहे. गादी मिळाली नाही
— विवेक पटाईत
Leave a Reply