मराठी गीतकार, पटकथा-संवादलेखक, नाटककार, अभिनेता गुरु ठाकूर यांचा जन्म १८ जुलै रोजी झाला.
गुरू ठाकूर हे नाव उच्चारले की त्यांनी लिहिलेली ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘मल्हार वारी’, ‘मला वेड लागले’ ते अगदी ‘माउली माउली’ अशी विविध प्रकारची, बाजाची आणि ढंगांची गाणी रसिकांच्या ओठावर येतात. प्रामुख्याने ‘गीतकार’ अशी ओळख असलेले गुरू ठाकूर यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला रंगमंचावर अभिनय करत असताना एका एकांकिकेसाठी गाणे हवे म्हणून ते लिहिले आणि पुढे कवी-गीतकार अशीच त्याची ओळख झाली.
मराठी चित्रपट, मालिका क्षेत्रात त्याने आपल्या गाण्यांनी स्वतंत्र ठसा उमटविला, वेगळी ओळख निर्माण केली. नटरंग, गणवेश या चित्रपटात आणि रेशीमगाठी, तुझ्याविना आदी या मालिकेत अभिनय केला आहे. नटरंग, नारबाची वाडी, अगं बाई अरेच्या, श्रीयुत गंगाधर टिपरे, हसा चकट फू आदी चित्रपट आणि मालिकांचे त्यांनी पटकथा-संवाद लिहिले आहेत.
तू तू मी मी, आता होऊनच जाऊ द्या, भैया हातपास पसरी या नाटकांतील, हसा चकट फू, असंभव, कुलवधू या मालिकेतील आणि अगंबाई अरेच्या, मातीच्या चुली, मी शिवाजी राजेभोसले बोलतोय, नटरंग, झेंडा आदी मराठी चित्रपटातील गाणीही गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत.
गुरु ठाकूर हे छायाचित्रकार आणि राजकीय व्यंगचित्रकार म्हणून पण प्रसिध्द आहेत.
गुरु ठाकूर यांची गाणी
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply