लहानपणी गुलशकुमार वडिलांच्या दुकानावर ज्यूस विक्रीत त्यांना मदत करत होते. त्यांचा जन्म ५ मे १९५१ रोजी झाला. येथूनच त्यांना उद्योगाचे धडे मिळाले आणि त्यातील रस वाढत गेला. ते २३ वर्षांचे असताना त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने एक दुकान खरेदी केले आणि रेकॉर्डर्स आणि ऑडिओ कॅसेट विक्री सुरु केली. त्यानंतर पुढे त्यांनी नोएडा येथे स्वतःची कंपनी सुरु केली आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण केली.
गुलशन कुमारांनी त्यांच्या कॅसेट बिझनेसला ‘सुपर कॅसेट इंडस्ट्रिज लिमिटेड’ हे नाव दिले. याच कंपनीला टी-सीरीज नावानेही ओळखले जाते. गुलशन कुमारांनी ओरिजनल गाणी दुसऱ्या गायकांच्या आवाजात रेकॉर्ड करुन त्या कॅसेट कमी किंमतीत विक्री करण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी त्यांनी भक्ती संगीताकडेही मोर्चा वळवला.
देवा-धर्माची गाणी रेकॉर्ड करुन ती त्यांनी प्रसिद्ध केली. काही गाणी ते स्वतः गात होते. ७० च्या दशकात गुलशन कुमार यांच्या कॅसेटची डिमांड वाढत गेली आणि म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये ते यशस्वी बिझनेसमध्ये गणले जाऊ लागले. ऑडिओ कॅसेट्समध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार फिल्म इंडस्ट्रीकडे वळले आणि त्यासाठी ते मुंबईला पोहोचले. बॉलिवूडमध्ये बस्तान बसविल्यानंतर ते हिंदू पौराणिक कथांवर आधारित चित्रपट आणि सीरियल्स देखील प्रोड्यूस करु लागले.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार यांनी त्यांच्या कमाईचा एक हिस्सा सामाजिक कामासाठी देण्यास सुरुवात केली. वैष्णोदेवीचे ते निस्सीम भक्त होते. त्यांनी वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी भंडारा सुरु केला होता. आजही तो भंडारा अविरत सुरु आहे. या भंडाऱ्याच्या माध्यमातून भक्तांना मोफत भोजन दिले जाते गुलशन कुमार यांनी वैष्णोदेवीची अनेक गाणी गायली आहेत. गुलशन कुमार यांचे १२ ऑगस्ट १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply