कारने प्रवास करतांना पुढच्या वाहनाच्या पाठीमागे काय लिहिलंय हे वाचण्याची अनेकांना आवड असते .
खासगी छोट्या वाहनांवर देवांची चित्रे, धार्मिक वचने , अक्षरे असे काहीतरी असते. विविध वाहनांवर लिहिलेले अनेक गंमतीदार संदेश दाद द्यावी असे असतात. लोकप्रबोधनाचे संदेश लिहिलेली वाहने हे पुण्याचे वैशिष्ठय !
बहुतेक ट्रक्सच्या मागे ” Horn O. K. Please ” किंवा ” Sound Horn ” ” बुरी नजरवाले, तेरा मुंह काला ” असे लिहिलेले असतेच.पूर्वी ट्रक्सच्या मागे तर ” अनारकली, भरके चली “, ” जन्नतकी परी नही, जमीं की शाहजादी ”
” नाजूक हूँ मै , मुझे ना छू ना ” अशा तऱ्हेची शेरोशायरीवजा वाक्ये हमखास पाहायला मिळत असत.
एकदा लॉन्ग ड्राईव्हवर असतांना संगीतकार सी. रामचंद्र यांनी त्यांच्या पुढच्याच ट्रकच्या मागे लिहिलेल्या २ ओळी वाचल्या. त्या ओळी अशा होत्या–
“ना मिला है ना मिलेगा मुझे आराम कहीं ।
मै मुसाफिर हूँ मेरी सुबह कहीं शाम कहीं ।।”
सी. रामचंद्रना त्या इतक्या आवडल्या की त्यांनी याच ओळींचा मुखडा लिहून एक कव्वाली तयार केली. गायक आणि संगीतकारही ते स्वतः:च ! ती हिंदी कव्वाली त्यांनी चक्क “धनंजय” या मराठी चित्रपटात घेतली होती. आजदेखील ही कव्वाली युट्युबवर ऐकता येते.
वाहनावरच्या पाट्यांवर शेरोशायरी लिहिली जाणे ठीक आहे पण वाहनावर लिहिल्याची कव्वाली होणे हे दुर्मिळच !… आणि ही चित्रपटात असणे हे त्याहूनही दुर्मिळ !!
— मकरंद करंदीकर,
अंधेरी ( पूर्व ), मुंबई,
https://www.youtube.com/watch?v=977lNDv38x4
Leave a Reply