मी “बाबासाहेबांवर” काही लिहिले..
लाेकांनी मला फोन करून विचारले
“तुम्ही बौध्द किंवा दलित आहात का…?”
मी आपल्या ” शिवछत्रपतींवर”काही लिहिले..
लाेकांनी मला फोन करून विचारले
“तुम्ही मराठा आहात का…?”
मी आपल्या ” सावरकर, टिळक यांच्यावर”काही लिहिले..
लाेकांनी मला फोन करून विचारले
“तुम्ही ब्राह्मण आहात का…?”
मी “फुलेंवर” काही लिहिले
लाेकांनी मला फोन करून विचारले
“तुम्ही माळी आहात का..?”
मी “अहिल्या देवींवर” काही लिहीले
लाेकांचा मला फोन आला अन् विचारले
“तुम्ही धनगर आहात का..?”
मग मी “माणसावर” काही लिहिले
मला कोणाचाही फोनच आला नाही…
कमेंट बाॅक्स मधेही काहीच प्रतिसाद नाही..
वाट पाहतोय अजून….
“ती” माणसे गेली कुठे…?
माणसाने स्वतःतला माणूस मारून..
माणूसकी दूर ठेवून…
फक्त आणि फक्त “जात” जिवंत ठेवली आहे..
सर्वांनी गाड झोपेतून उठा.. आणि
एकमेकांना माणूस म्हणून बघा….माणूस म्हणून….!
– एक सुजाण माणूस
– एक भारतीय..! जय हिन्द..!
— गणेश कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग
Leave a Reply