पुण्याचे भूषण असलेली संगीत क्षेत्रातील एक पूज्य वास्तू ” पुणे भारत गायन समाज ” आज १०७ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. देवगंधर्व पंडित भास्करबुवा बखले यांनी १ सप्टेंबर १९११ साली स्थापन केलेली हि वास्तू पुढे अनेक दिग्गज कलावंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आणि आजही होत आहे. या संस्थेमार्फत संगीत प्रचार आणि प्रसाराचे काम गेली १०७ वर्ष अविरत पणे चालू आहे.
याच संस्थेच्या भास्कर संगीत विद्यालयामध्ये गायन,तबला,सतार,हार्मोनियम,व्हीयोलीन,कथ्थक, भरतनाट्यम इत्यादी कलाप्रकारांचे शात्रोक्त पद्धतीनी शिक्षण दिले जाते . यामध्ये मध्यमा,विशारद,पारंगत अशा १० वर्षाचा लिखित अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जाते.
संस्थेच्या अभ्यासक्रमाला १९६२ मध्ये राज्यसरकारने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक संगीत विद्यालये भास्कर संगीत विद्यालयाशी संलग्न आहेत.सौ.शैला दातार या पुणे भारत गायन समाजच्या अध्यक्षा आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply