दिन दिन दिवाळी
शब्द कानी पडती
आली आली दिवाळी !
खमंग रुचकर स्वाद
काय पदार्थांच्या लगबगी
बनविण्या गृहिणी सजती !
नटण्याची हौस किती
चारचौघीत उठून दिसण्या
पैठणी झुलती अंगावरी !
मुलींची लगबग रांगोळीसाठी
तर्हे तर्हेचे रंग किती?
रंगसंगती किचकट भारी !
घाई कंदिलासाठी मुलांची
पंचकोनी का षटकोनी
पारंपरिकच बरा दिसे !
गोवत्स द्वादशी दिन
गोवत्साचे पूजन
वसुबारस म्हणती त्यास !
धनत्रयोदशी धनलक्ष्मी दिनी
श्रीहरीगुरुग्रामी श्रद्धावान श्रीयंत्राचे
प्रतिवर्षी पूजन करती !
नरकचतुर्दशी अभ्यंगस्नान
सुगंधी उटणे लाऊन
भल्या पहाटेस अंघोळ !
अश्विन अमावास्या लक्ष्मीपूजन
लगबग दुकानदारांची करण्या
चोपडा पूजन सर्वत्र !
बलिप्रतिपदा दीपावली पडावा
घेण्या आहेर मोठा
नव्या नवरीच्या हेका !
भाऊबीज दिवस भावाबहिणीचा
प्रेमाच्या ‘भेटी’ गाठीचा
दिवाळीचा दिवस समारोपाचा !
जगदीश पटवर्धन
Leave a Reply