नवीन लेखन...

खरंच इतके महत्व द्यावे का?

ज्या गोष्टींचे जगाला काहीच नवल वाटत नाही अशा गोष्टींना भारतात डोक्यावर घेतले जाते.
 इंग्रजी :-
जगात कुठेही नसेल इतके महत्व भारतात इंग्रजी भाषेला दिले जाते? इंग्रजी बोलता येत नसेल तर तो अडाणी समजला जातो … अरेरे !!!
गोरेपणा :-
गोरेपणाला भारतीय मुर्ख मंडळी एवढे भुललेत की या गोष्टीचा फायदा घेउन काही नामवंत कंपन्या गोरे बनवन्याच्या क्रिम तयार करुन दरवर्षी हजारो कोटी रुपये कमवतात !
रिअॅलिटी शो :
यात तर सगळं ठरवुन केलं जातं आणि भारतीय मुर्खासारखे खरं समजुन बघत बसतात !? त्यामुळे वास्तविक खरोखर असणारे कलाकार पडद्यामागेच राहतात हेच खुप मोठे दुर्दैव आहे !
लग्नसमारंभ :
बडेजाव आणि प्रतिष्ठा दाखवण्याचा सर्वात मोठा मार्ग.. काही मुलींच्या बापांना तर 25 वर्षे जीव लावलेल्या मुलीच्या विरहा पेक्षा दिखावा महत्वाचा वाटतो !
इंजीनियरिंगची पदवी :
७० % मुलांच्या बापांना आपल्या मुलाने समाजसेवक, नामवंत खेळाडु, देशभक्त बनन्यापेक्षा इंजीनियरिंग पदवी मिळवुन श्रीमंत बनावं असेच वाटते.
बाकीच्या क्षेत्रात नोकरी करणे काय पाप आहे का ??
क्रिकेट :
भारतात क्रिकेट हा खेळ नसुन धर्मच मानुन त्याची पुजा केली जाते ! लाखोंची सट्टेबाजी चालते ! भारतातील इतर अनेक खेळांना जगात डिमांड मिळते भारतात फक्त क्रिकेटच पाचवीला पुजलाय !
सोने :
जगात ज्या सोन्याचा सर्वांना कंटाळा येतो तेच सोने मिळवण्यासाठी भारतीय महिला जणु काय शपथच घेउन बैसल्यात ! त्याच सोन्याची भारतात जीवघेणी चोरी सुद्धा होते वा! काय छान दुर्दैव आहे !
लोक काय म्हणतील ? :
हे केले तर लोक काय म्हणतील… ते खाल्ले तर लोक काय म्हणतील… हे कपडे घातले तर लोक काय म्हणतील…. अरे काय चाललय ?? लोकांच्या म्हणण्याने चालाल तर मुर्ख बनाल ! आत्महत्या करणारे पण हाच विचार करतात लोक काय म्हणतील ?? मी तर यांना अर्धवटच म्हणतो
बोर्डाची परिक्षा :
जगात कुठे इतके महत्व दिले जात नाही येवढे भारतात बोर्डाच्या परिक्षेला महत्व दिले जाते ! किती तरी मुलं तर बोर्डाची परिक्षा ऐकुनच येवढे घाबरतात की ते परिक्षेला सुद्धा जात नाहीत.
परदेशी ब्रँड :
ज्या वस्तु परदेशात कचर्यात टाकुन दिल्या जातात त्या गोष्टी भारतात लाखों रुपये मोजून खरेदी केल्या जातात ! जे पदार्थ परदेशात जनावरांना खायला देतात तेच पदार्थ भारतात कधी कधी माणसांच्या नावावर खपवले जातात…
कसले हे दुर्दैव !
भारतातील ज्या इतिहासाचा जगात आदर्श घेतला जातो तोच इतिहास भारतात चुकीचा आणि खोटा सिद्ध केला जातो !
कमाल आहे राव ?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..