मराठी काव्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९६७ रोजी झाला. काही माणसांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या कामाइतकेच व्यक्तिमत्त्वातही असते. ते किशोर कदम यांच्यातपण आहे. किशोर कदम यांना महाराष्ट्राचा लाडका कवी आणि नट म्हणता येईल. संवेदनशील कलावंत म्हणून सुद्धा किशोर कदम यांनी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. ‘गारवा’ या अल्बमसाठी त्यांनी लिहिलेल्या कविता विशेष गाजल्या.
‘गारवा’ची लोकप्रियता हा एक विक्रम आहे आणि तो कोणीच मोडू शकलेला नाही. वृद्धांपासून युवकांपर्यंत अनेकांच्या ओठावर ‘बघ माझी आठवण येते का? ’सारख्या ओळी रुजू लागल्या. ‘ऊन थोडं जास्त आहे’ सारखं काव्य कविता न वाचणार्यां च्याही कंठात जाऊन बसले. हे यश जितकं अल्बमची निर्मिती करणार्याा ‘राजश्री प्रॉडक्शन’च्या मार्केटिंग विभागाचं आहे. ‘गारवा’ हा अल्बम गाजल्यावर किशोर कदम यांना हिंदीत लिखाणासाठी विचारले गेले, पण लाखो रुपयाचं आमिष नाकारत त्याने हिंदीत लिहिणे त्या क्षणी नाकारले. किशोर कदम यांचे शिक्षण आर.व्ही.टी.एच.एस. शाळेत झाले. त्यांच्या वडिलांचे आणि भावाचे सलून होते. किशोर यांच्या घरच्यांनी त्यांना तू हवे ते कर, असे सांगितले. त्याच्या हातात कात्री-कंगवा येऊ दिला नाही. किशोर कदम यांचे अभिनयाचे शिक्षण सत्यदेव दुबे यांच्याकडे झाले. ते दुबेजींचा लाडका शिष्य होता.
पालेकर दिग्दर्शित ‘ध्यासपर्व’(मराठी), ‘कल का आदमी’(हिंदी) या चित्रपटांत त्याने काम केले. प्रा. र. धों. कर्वे या संततिनियमनासंदर्भात कार्य करणार्या’ जगावेगळ्या व्यक्तीची भूमिका त्यांनी ‘ध्यासपर्व’ या सिनेमात केली. श्याम बेनेगल यांच्या ‘सलीम’चाही तो हिरो होता. अरुण खोपकर यांनी बनवलेल्या नारायण सुर्वेंवरील लघुपटात त्यांनी सुर्व्यांची व्यक्तिरेखा साकारली. इतर कलावंत आणि किशोर यात फरक असा, की तो खूप वाचनात रमणारा कवी आहे. तत्त्वज्ञान, झेन बुद्धिझम, ओशो रजनिशांची पुस्तके, नेरुदा, सीझर वाह्येव्होसारखे स्पॅनिश कवी, हेन्री डेव्हिड थोरो असे वाट्टेल त्या विषयावरचे तो वाचत असतो. ‘टाइम्स म्युझिक’तर्फे ख्यातनाम कवी गुलजार व मराठी कवी सौमित्र यांनी स्वत:च सादरीकरण केलेल्या २४ कवितांची ‘तरीही’ ही सीडी ऐकणे, हा एक वेगळाच अनुभव आहे.
प्रेम आणि पाऊस या कवी सौमित्र यांच्या कवितेतील खास बाबी आहेत. त्याने गुलजार यांच्या अनेक कविता हिंदीतून मराठीत आणल्या. गुलजार यांनीदेखील त्याच्या कविता हिंदीत नेल्या. ते सध्या गुलजारांवरील ‘बात पश्मिनेकी’ हा कार्यक्रम सादर करतात. किशोर कदम यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत ज्येष्ठतेच्या यादीत घेतले जात आहे. नटरंग, जोगवा, फॅण्ड्री अशा अनेक चित्रपटांत उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांनी पुरस्कार मिळविले आहेत. किशोर कदम यांच्या बाबतची एक आठवण. आशा भोसले यांनी ‘आपली माणसं’ या चित्रपटासाठी एक गाणे गायले. ते गाऊन झाल्यावर त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. त्यांनी कुतूहलाने गीतकाराचे नाव विचारले. तो आशातार्इंच्या डोळ्यांत पाणी आणणारा गीतकार होते म्हणजेच, किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र. समुद्र हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. त्याच्या कवितांमधून अनेकदा समुद्राविषयी उल्लेख असतात.
उदाहरणार्थ
जगण्यास तेव्हा खरा अर्थ होता,
निरर्थास ही अर्थ भेटायचे
मनासारखा अर्थ लागायचा,
अन् मनासारखे शब्दही यायचे
नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने,
किती वेळ बोलायचे
निघोनी घरी शेवटी जात असता,
वळुनी कितीदा तरी पाहायचे
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply