आईचे ऋण
मूर्तिमंत वाटे देवी लक्ष्मी प्रेमळ स्वरूप माझे आई
धन्य जहलो जन्म मिळूनी उदरामाजी तुझिया ठायी
प्रेमाचा तो सागर देखिला तुझ्याच ह्रदयाजवळी जावूनी
निकटपणाचा आनंद घेत नऊ मास मी उदरी राहुनी
दुग्धामृत पाजून मजला वाढवी अंकुर काळजीने
घास भरवण्या काढून ठेवी उपाशी राहून आनंदाने
निद्रा न लागे तुजला तेंव्हा आजारी जेंव्हा मी पडलो
पाणी दिसले तुझ्या नयनी दु:खाने जेंव्हा हळहळलो
अनंत ऋणे करुनी ठेवसी तुच माझ्या शिरावरी अशक्य आहे तेच फेडणे ह्याच जन्मी तरी
मात्रत्वाचे ऋण फेडण्या असे वाटते, माताच व्हावे
पुनर्जन्मी त्नू पुत्र होऊनी सेवा करण्या मजला मिळावे.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply