नवीन लेखन...

कालिदासाचा न्याय

भोज राजाच्या पदरी असलेला कालिदास चांगला कवी होताच. परंतु इतर कवी व कलावंतांचीही त्यालाचांगली कदर होती. गोरगरीबांनाही तो राजाकरवी मदत देई.

एकदा एक दरिद्री शेतकरी कालिदासला भेटला व त्याने आपले दारिद्रय करण्याची विनंती केली. कालिदासाने दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात येण्यास सांगितले. मात्र, येताना रिकाम्या हाताने न येता राजासाठी ऐपतीप्रमाणे कोणतीही भेटवस्तू घेऊन ये, अशी सूचना केली. त्या शेतकऱ्याने येताना आठ-दहा उसाची कांडकी आणली होती. कालिदासानेही ती घेऊन दुसऱ्या दिवशी दरबारात येण्यास सांगितले.

शेतकरी रात्रीच्या मुक्कामासाठी एका धर्मशाळेत गेला. दमूनभागून आल्यामुळे रात्री त्याला गाढ झोप लागली. त्या शेतकऱ्याचे गाठोडे काही लबाड माणसांनी पाहिले होते. रात्री शेतकरी झोपल्यावर त्यांनी गाठोड्यातील सर्व उसाची कांडकी पळविली व गाठोडे रिकामे दिसल्यास शेतकरी चोरीची तक्रार करील म्हणून त्या गाठोड्यात अर्धवट जळालेल्या काटक्या ठेवून गाठोडे बांधून जसेच्या तसे ठेवून दिले.

त्या शेतकऱ्याला याची काहीच कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो गाठोडे घेऊन राजदरबारात आला व त्याने भोजराजाला नम्रपणे नमस्कार करून आपल्याजवळचे गाठोडे भेट म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. सेवकांनी गाठोडे उघडले तर आत अर्धवट जळालेल्या काटक्या होत्या. ते पाहून शेतकरी घाबरून थरथर कापू लागला. शेजारीच उभ्या असलेल्या कालिसादालाही त्या काटक्या पाहून आश्चर्य वाटले. त्या जळक्या काटक्या पाहून दरबारातील काही लोक संतप्त झाले. त्यांना राजाचा हा अपमान वाटला म्हणून त्यांनी त्या शेतकऱ्याला कडक शिक्षा करण्याची मागणी केली.

मात्र कालिदासाने सर्वांना शांत केले. तो राजाला म्हणाला की, महाराज, त्या शेतकऱ्याला तुम्हाला जे नेमके सांगायचे आहे तेच त्याने त्याच्या भेटवस्तूतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची परिस्थितीच अशी आहे की, तो जगूही शकत नाही आणि मरुही शकत नाही. त्यामुळेच त्याने अर्धवट जळालेल्या काटक्या आपल्याला भेट म्हणून सादर केल्या आहेत.

कालिदासाचा तो युक्तिवाद ऐकून भोज राजा खूश झाला व त्याने त्याच गाठोड्यात आपल्या हाताने ओंजळभर सुवर्णमोहरा त्या शेतकऱ्याला दिल्या. क्षणात सधन झालेला शेतकरी कालिदासाला मनोमन धन्यवाद देऊन राजदरबारातून निघून गेला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..