मार्ग निसर्गाचे सदा, निश्चीत आणि अढळ ।
चालतो त्याच दिशेने, जसजशी येते वेळ….१
चालत आसता थांबे, भटके वाट सोडूनी ।
करूया काही आगळे ठरवी विचारांनी….२
आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे ।
नियतीची वाट मात्र, त्या दिशेने जात नसे….३
परिस्थितीचे कुंपण, टाकले जाते भोवती ।
कळत वा नकळत, मार्गी त्यास खेचती….४
करून घेतो निसर्ग, वाटते त्याला हवे जे ।
अकारण तुम्हा वाटते, हे तर आहे माझे….५
जीवनाच्या सांजवेळी, बघता मागे वळूनी ।
प्रवास केला वेगळा, हेच येते समजूनी….६
मिळूनी काही आगळे, समाधानी वृत्ती येते ।
आनंदाने निरोप घ्या, नियती तुम्हा सांगते….७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply