नृत्यासाठी त्यांच्या आई-वडिलांचे उत्तेजन मिळाले, मेडिकलच्या अभ्यासक्रमास जाता येईल इतके मार्क पडूनही केवळ नृत्यातच करिअर करायचे, या दृढनिश्चेयाने त्या या क्षेत्राकडे वळल्या. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९४८ रोजी मुंबई येथे झाला.
सुचेता भिडे यांचे शिक्षण मुंबईतील बालमोहन विद्यामंदिरात झाले. आचार्य पार्वतीकुमार आणि तंजावरचे गुरू के. पी. किटप्पा यांच्याकडे त्यांनी नृत्याचे शिक्षण घेतले. कला अधिक चांगली शिकता यावी म्हणून त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश घेतला. त्या वेळी चित्रकलेच्या परीक्षा दिल्याशिवाय इकडे प्रवेश मिळत नसे. मग काय, एक वर्षाचा गॅप घेणे आले. तो त्यांनी घेतला आणि रीतसर चित्रकलेच्या परीक्षा दिल्या. त्या वर्षाच्या काळात त्यांनी पार्वतीकुमार यांच्याकडे नृत्याचेच केवळ धडे गिरवले.
संपूर्ण वर्ष केवळ नृत्याचाच विचार, ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब होती. आज कधीही त्या वर्षाची आठवण आली, की पुन्हा लहान व्हावे आणि ते वर्ष जगावे, असे सुचेता भिडे सहजतेने लिहून जातात. सकाळी सात ते सायंकाळी सात, त्या नृत्याच्याच विश्वाीत असत. सुचेता भिडे चापेकर यांनी भारतात व भारताच्या बाहेर अनेक नृत्याचे कार्यक्रम केले आहेत, त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. पुणे महापालिकेने रोहिणी भाटे यांच्या नावाने दिला गेलेला २०१५ सालचा ’स्वर्गीय गुरू पंडिता रोहिणी भाटे पुरस्कारही मिळाला आहे. सुचेता भिडे-चापेकर यांनी केलेली नृत्यगंगा ही नृत्य शैली ही कला क्षेत्राला दिलेली मोठी देणगी आहे.
सुचेता भिडे-चापेकर यांची कलावर्धिनी ही संस्था आहे. ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ ही भरतनाट्यम् या विषयासाठी वाहून घेतलेली संस्था आहे. नृत्यात्मिका हे त्यांचे आत्मचरित्र वाचण्यासारखे आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply