” जीवन कसे जगावे ” ..? हा माझा गुरुदेवांस प्रश्न.
गुरुदेवांनी हसत सहज उत्तर दिले :
” एकतर सहन करत किंवा सामना करत,
दोन्ही परिस्थितीत मी तुझ्या पाठीशी आहेच ”
मी नाही समजलो गुरुराया…
गुरुदेव पुढे म्हणाले :
” सहन करतांना तुझे पहिले पाऊल मागे पडेल आणि सामना करतांना पहिले पाऊल पुढे पडेल.
सहन करतांना तुझा दृष्टिकोन नकारात्मक ताणाने झुकेल तर सामना करतांना सकारात्मक ऊर्जेने उंचावेल.
सहन करत प्रगती खुंटते पण सामना करीत उत्कर्ष साधता येतो “.
माझा पुन्हा वेडा सवाल :
गुरुदेव पण आपण पाठीशी असता चिंता आम्ही कशास करावी…?
गुरुदेव पुन्हा सहज उत्तरले :
” ते तर माझे भक्तांस दिलेले वचन आहे ” योगक्षेमं वहाम्यहम् “.
पण जीवन तुम्हास जगायचे आहे, सहन अथवा सामना तुम्हास करायचा आहे,
नकारात्मक किंवा सकारात्मक दृष्टिकोन तुमचा असेल,
अधोगती किंवा प्रगती तुम्हास साधायची आहे,
मी पाठीशी आहे, हे जो स्मरतो तो सामना करतो आणि ज्यास माझा तणावात विसर पडतो,तो सहन करतो”.
गुरुदेव पुढे म्हणाले :
” तुम्ही सहन केलेत तर तुम्हास सोशिकतेचे बळ देईन आणि सामना केलात लढण्याचे सामर्थ्य देईन.
मी पाठीशी सदैव आहे, माझ्या लेकरांपासून मी कधीच दूर नव्हतो, नाही आणि नसेन “.
— पाध्ये काका
वासुदेव शाश्वत अभियान, वसई
Leave a Reply