नटसम्राट हा चित्रपट गेल्यावर्षी १ जानेवारीला नाना पाटेकरांच्या वाढदिवशी प्रदर्शीत झाला होता.
नटसम्राट ! ऐसा चित्रपट होणे नाही.
यशाच्या अत्तुच्य शिखरावर पोहोचल्यानंतर, वृद्धापकाळात तेच यश एक शाप ठरावे अशी गाथा असलेल्या कलाकाराची भूमिका वठावणे हे एक शिवधनुष्य पेलण्याइतके अवघड आहे. नाना पाटेकरांनी साकारलेले गणपतराव वयाच्या साठीत कलेच्या ४० वर्ष सेवेतून निवृत्त होतात. एक असा नट ज्याने हॅम्लेट, सिजर, ओथेल्लो आणि अशी बरीच मात्तबर पात्रे साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. नाना पाटेकर कलाकार म्हणून महान आहेच. पण आज महेश वामन मांजरेकर यांच्यातला दिग्दर्शक जिंकला असे वाटते. एखादी महान कथा हाताळणे म्हणजे शिवधनुष्य! त्यातूनच नाना पाटेकर यांचा सारखा कलाकार ! लहानपणी डॉ.लागूं चे नाटक पहिले होते. तत्कालीन कलाकार हे फक्त कलेला वाहून घेणारे होते. त्यांना व्यवहारज्ञान नव्हतेच. मग ते काल्पनिक गणपतराव बेलवलकर असोत, किंवा बालगंधर्व , दादासाहेब फाळके या सर्व लोकांनी जी कला लोकांसमोर सादर केली याची तोड नाही.असो ! एक सर्वोत्कृष्ठ चित्रपट सहकुटुंब पाहून वर्षाची सुरुवात छान झाली.
खूप खूप आपल्या रडवतो हा चित्रपट !
अगदी नाना च्या सर्वश्रेष्ठ संवादफेकीपासुन ते विक्रम गोखले सोबतच्या अभिनयाच्या लाजवाब जुगलबंदीपर्यंत सगळचं कसं काळजात खोलवर रुतणारं… वैभवकाळ पुरेपुर भोगुन समाधानानं रंगमंचावरुन निवृत्त झालेला नटसम्राट खर्याा आयुष्यात मात्र नशीबाच्या पायाखाली तुडवल्या जाताना बघवतं नाही… अन जे दिसतं ते अश्रु भरल्या डोळ्यांनी! विक्रमजी गोखले आणि नाना पाटेकर कित्येक फ्रेम मधे अक्षरशः रडवतात.. त्यांचं दुःख काळजाला भिडतं. विक्रमजींच्या घरातला प्रसंग केवळ अभिनयाची शाळाच म्हणुन पहावादिग्गज कलाकारांनी पूर्वी सजवलेला नटसम्राट नाना पाटेकर वेगळ्याच उंचीवर नेतात, नट, बाप, आजोबा, प्रेमळ पती आणि शेवटी बेघर वृद्ध सगळी रुपं नाना पाटेकर यांनी लीलया रंगवली आहेत. केवळ असाच्या असा नाटकातून उचलून आणलेला चित्रपट नाही. नाटकाच्या तीन भिंतींच्या मर्यादा येथे नाहीत इतपतच हा विचार मर्यादीत नाही. केवळ दृश्यात्मक बदल असेदेखील नाही. एक चित्रपट म्हणून हे कथानक नव्याने मांडायची ही संधी आहे हे लेखक, पटकथालेखक आणि दिग्दर्शकाला व्यवस्थित कळले आहे. आणि या सर्वाचे भान कलाकारांना आहे. थोडक्यात सगळं जुळून आलंय असेच म्हणावे लागेल. विस्तारीत कथेतील संवाद आणि मूळ कथेतील प्रसिद्ध संवाद यांचा मेळ व्यवस्थित घातला आहे.
“कट्यार” मधे एक पुढील आशयाचं वाक्य आहे “कलाकाराला दाद केवळ टाळ्यांनीच मिळते असं नव्हे तर निःशब्द शांतता अन पाणावलेले डोळे ही त्याहून उच्च दाद होय”
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply