मूळच्या शोभा राजाध्यक्ष. त्यांचे वडील डिस्ट्रिक्ट जज होते. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९४८ रोजी झाला. शोभा डे यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली. तरूण वयात मॉडेल म्हणून मोठे नाव कमावल्यानंतर त्यांनी १९७० मध्ये पत्रकारिता सुरु केली. त्यांचे पती दिलीप डे.
पेज थ्री कल्चर अशी ओळख असलेल्या संपन्न भारतीयांच्या सांस्कृतिक- सामाजिक जीवनाशीच त्या आयुष्यभर प्रामुख्याने निगडित राहिल्याने त्यांच्या लेखनातूनही याच जीवनाचे चित्रण आढळते.
स्टारडस्ट, सोसायटी आणि सेलेब्रिटी या संपन्न वाचकांवर्गाच्या मासिकांचे संपादन त्यांनी केले. उद्योग मनोरंजन आणि संपन्न भारतीयांच्या जीवनावर त्यांनी प्रामुख्याने लिहीले. १९८० पासून त्या विविध भारतीय नियतकालिकांतून सातत्याने स्तंभलेखनही करीत आहेत. थेट, मामिर्क आणि पारदर्शी लेखन हे त्यांच्या स्तंभांचे वैशिष्ट्य मानले जाते.
अनेक पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. त्यात स्टारी नाईटस, सिस्टर्स, सिलेक्टिव्ह मेमरीज, सर्व्हायविंग मेन, स्पीडपोस्ट, स्पाउस – द ट्रूथ अबाऊट मॅरेज आणि सुपरस्टार इंडिया- फ्रॉम इनक्रेडिबल टू अनस्टॉपेबल या पुस्तकांचा समावेश आहे. डे यांच्या कादंब-या वाचकप्रिय असल्या तरी समीक्षकांनी कधीच त्यांना नावाजले नाही. शोभा डे यांनी ‘दोन वेळा’ लग्न केलंय आणि गेली अनेक वर्षं त्या आपले दुसरे पती दिलीप डे यांच्यासोबत सुखाने नांदताहेत. त्यांच्या म्हणजे डे कुटुंबातल्या सहा मुलांत शोभा डे व किलाचंद यांची दोन मुलं, डे यांना त्यांच्या आधीच्या विवाहसंबंधातनं झालेली दोन मुलं आणि शोभा डे व दिलीप डे यांना त्यांच्या या दुस-या विवाहातनं झालेल्या दोन मुली असा सहा मुलांचा हा परिवार आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply