नवीन लेखन...

मी तिला विचारलं,

मी तिला विचारलं,तिनं लाजून होय म्हटल,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं……..तुमचं लग्न ठरवुन झालं?कोवळेपण हरवुन झालं?देणार काय? घेणार काय?हुंडा किती,बिंडा किती?याचा मान,त्याचा पानसगळा मामला रोख होता,व्यवहार भलताच चोख होता..हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसंअसलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं…ते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..मी तिला विचारल,तिनं लाजून होय म्हटल,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,इराण्याच्या हॉटेलात,चहासोबत मस्कापाव मागवलातेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खालीत्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडतपोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघतजीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?मी तिला विचारलं,तिनं लाजून होय म्हटल,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….मग एक दिवस,चंद्र, सुर्य, तारे, वारे,सगळं मनात साठवलं,आणि थरथरणाऱ्या हातांनी ,तिला प्रेमपत्रं पाठवलंआधिच माझं अक्षर कापरंत्या दिवशी अधिकचं कापलंरक्ताचं तर सोडाच रावहातामधलं पेनसुद्धा होतं तापलंपत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,पाकिटावर तिकिट नव्हतं लावलंपत्रं तिला पोचलं तरिसुद्धातुम्हाला सांगतो,पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजेमनाच्या फ़ांदीवर,गुणी पाखरु येउन बसलंमी तिला विचारलं,तिनं लाजून होय म्हटल,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं……पुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवलीमी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा ट

वली…तसा प्रत्येकजण नेक असतो,फ़रक मात्र एक असतोकोणता फ़रक?मी तिला विचारलं,तिनं लाजून होय म्हटल,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं……

शेळके नानासाहेब.

— नानासाहेब शेळके

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..