कमल अमरोही यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून, महल, पाकीज़ा, रज़िया सुलतान असे भव्य कलात्मक चित्रपट स्क्रीनवर दिले. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९१८ रोजी झाला. कमल अमरोही हे सर्वोत्तम गीतकार, पटकथालेखक आणि संवाद लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी भारतीय चित्रपटसुर्ष्टीत खूप मोठे योगदान दिले आहे. कमाल अमरोही व मीनाकुमारीचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अशीच एक दंतकथा. आणि त्यातील सारी गाणीही. खरंतर एका पातळीवर हा संपूर्ण चित्रपटच एक भव्य करुण काव्य आहे. कोठा आणि तवायफ हा हिंदी चित्रपटांमध्ये तसा खूप वेळा येणारा विषय. केवळ याच विषयाला वाहिलेले चित्रपटही बरेच आहेत. पण भव्यतेचे आणि परिपूर्णतेचे कमालीचे आकर्षण असणार्याय कमाल अमरोहींच्या दिग्दर्शनाने एरवी घिस्या-पिट्या विषयावरील या चित्रपटाला सौंदर्याचे एक वेगळेच मूल्य मिळवून दिले आहे.
पाकिजा प्रदर्शित झाला १९७२ साली, पण खरंतर त्याची सुरुवात झाली १९५८ मध्ये. पाकिजा बनायला १४ वर्षांचा वेळ लागण्याचे मुख्य कारण होते ते दिग्दर्शक कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी असलेली पाकिजाची नायिका मीनाकुमारी यांच्यातील तणाव आणि नंतर तलाक. खरंतर हा चित्रपट पूर्णच झाला नसता, पण सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर अखेर दोघे पुन्हा एकत्र काम करण्यास तयार झाले आणि चित्रपट पूर्ण झाला. कमल अमरोही यांचे निधन ११ फेब्रुवारी १९९३ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply