नवीन लेखन...

गाण्याच्या कहाण्या – कुहू -कुहू बोले कोयलिया

सर्कस आणि जादूच्या सिनेमाच्या आकर्षणाच्या दिवसात पाहिलेला ‘सुवर्ण सुंदरी ‘हा सिनेमा . त्यातील जादूची चटई , कमंडलू आणि लाकडी कुबडी अजून आठवते . ‘राम नाम जपना ,पराया माल अपना ‘ हे गाणे म्हणण्यात बालपणाचे काही दिवस मी  घालवलेत . आज हे आठवण्याचे कारण ‘कुहू कुहू बोले कोयलिया —‘ हे गाणे ऐकण्यात आलं . माझ्या आवडीच्या गाण्यात आजही ते अग्रभागी आहे  .

१९५७ साली पी . आदिनारायण राव यांनी ‘सुवर्ण सुंदरी’ तेलगूत बनवला . मग त्यांनी तो हिंदीत तयार केला . दोन्ही भाषेत या सिनेमाने इतिहास घडवला . यात श्रवणीय गाण्यांचा सिहाचा वाटा होता .

‘कुहू -कुहू बोले कोयलिया —-‘ हे गाणे एक राग मालिका आहे . यातील  प्रत्येक कडवे  एका  नवीन रागावर बेतले आहे .या  गाण्याला चार कडवे आणि चार राग लाभले आहेत ! या गाण्याचे कॉम्पोजिशन आदिनारायण राव (या सिनेमाचे संगीतकार )यांनी तेलगू व्हर्जन च्या वेळेसच तयार करून ठेवले  होते  . या सिनेमाची कथा पौराणिक कम लव स्टोरी ! गाणंत चार चार राग , tune आधीच तयार . त्याल साजेलशे रागदारी पेलणारे काव्य हवे होते . प्रत्यक शब्द महत्वाचा ! हि तारेवरची कसरत लीलया पार  केली पंडित भरत व्यासानी ! आणि स्वर संजीवनी फुंकली दोन दिग्ग्जनी ,लता मंगेशकर आणि मोहमद रफी यांनी ! गाणे अमर झाले हे सांगणे नलगे !

या गाण्यात बासरीचा खूप सुंदर वापर केलाय . सुरवातीचा फ्लुएट पीस अभ्यासासाठी छान आहे . गाण्याची सुरवात लताजींच्या आवाजाने होते . ‘ कुहू -कुहू बोले कोयलिया —‘ लताजींबद्दल न लिहलेलेच चांगले . (म्या पामराच्या कुवती बाहेरचे काम . ) यातील “कुहू -कुहू “कसे उच्चारावे हे कोकिळेने सुद्धा त्यांच्या कडून शिकून घ्यावे इतके ते सुरेख आणि सुरेल म्हणले आहे ! ‘सज सिंगार रितू आयी बसंती ‘ नंतर ‘जैसे नार कोई हो रसवंती ‘ येथे रफीजी ,  लताजींचा सूर त्यांचा लयीत उचलतात !केवळ अफलातून !संगीताचा सूर,  लताजी आणि रफ़ीचा स्वर हा त्रिवेणी संगम गाणे संपे पर्यंत अनुभवायला मिळतो !
या काव्याची रचना राग सोहिनीतली . हा राग उत्तर रात्रीचा .

‘काहे घाटाने बिजुरी चमके ?’ याच्या उत्तरादाखल या कडव्यात एक सुंदर कल्पना मांडली आहे . “कदाचित मेघराजानी ‘ बादलीया ‘च्या  शामल मुखाचे चुम्बन घेतले असेल !”येथे रफीनी लताजींच्या सुरांशी जुळून घेतल्याचे जाणवते .
मोहंमद रफींची ‘रेंज ‘ अफलातून आहे . “तू गंगाकि मौज —“,” ओ दुनियाके रखवाले —“या सरख्या गाण्यातून आपणास त्याचा प्रत्यय येतो . एखाद्या रॉकेट सारखा त्यांचा सूर वेगाने चढत  ,आकाश गंगेत मिसळतो ,तर दुसऱ्या क्षणी सामान्य होतो !
हे कडवे बहार रागातले . या रागाचा ‘शृंगार ‘रस आहे . म्हणूनच ‘हो सकता है ,मेघराजने बादरियाका शाम शाम मुख चुम लिया हो !’ या शृंगारिक ओळी पंडितजींनी लिहल्या असतील .

‘चंद्रिका देख छायी —‘ ने तिसरे कडवे सुरु होते . चंद्र ,आणि चांदणे या कडव्यात शिंपले आहे . ‘चंद्रिका देख छायी ‘म्हणताना अंजली देवींनी (या सिनेमाच्या नायिका ),मान न हलवता केवळ डोळ्यांच्या बुबळांनी चंद्रा कडे केलेला संकेत ,हा या कडव्याचा ब्युटी स्पॉट आहे ! त्यासाठी व्हिडीओ चालू असताना आपण डोळे मिटून गाणे ऐकत असतो (गाणे लागले कि डोळे आपोआप मिटतात हो !) ते उघडून पहावे हि विनंती !
हे कडवे जौनपुरी रागातले . अतिशय गोड वाटतो ऐकताना . याला जाणकार Morning melody का म्हणतात हे ऐकल्यावरच उमगेल .

या गाण्याचा शेवट ‘सरस रात मन भाये प्रियतमा —‘ने रफीच्या आवाजाने सुरु होते . मागील तिन्ही कडवी लताजींच्या आवाजात सुरु होतात ,आणि त्यांच्याच आवाजात संपतात . यात  पंडित व्यसनी ‘मन सानंद ,आनंद डोले ‘ अशे शब्द लिहलेत . लताजी आणि रफीनी ,तसेच स्पष्ट उच्चारलेत ! दोघांनीही किती बारकाव्याने आणि अवधानाने गायिले याचे हे उदाहरण .
शेवटचे कडवे यमन रागातले . हा राग केव्हाही गाता येतो . पण संध्याकाळची वेळ याला भावते . रागदारी शिकताना हा पहिल्या पायरीवरच भेटतो !

मी या गाण्याची तेलगु व्हर्जन ऐकली. लताजी आणि रफीजी पेक्षा त्या तेलगु गायकांनी खूप सहजतेने गायिल्या सारखे वाटले . पण गमतीचा भाग असा कि त्या वर्षीचा राष्टीय पुरस्कार हिंदी व्हर्जनला मिळाला !रागमालिका प्रयोगा साठी किमान चार रागांची गुफाण आवशक असते . कुहू -कुहू — या गाण्यात हि गुंफण मस्त घट्ट आहे . कोठे जोड खटकत नाही , पायरी सुटल्या सारखे वाटत नाही ,श्रावणानंदात खंड पडत नाही !हेच या गाण्याचे बल स्थान आहे . रागमालीकेचा विषय निघालाय म्हणून सांगतो ‘देव सभास्थलम –‘ या माल्य्याळी रागमालीकेतील गाण्यात तब्बल नऊ राग वापरलेत ! आणि सिनेमाचे नाव आहे -His HighnessAbdulla !(१९९० ) सवड मिळाली तर जरूर ऐक . आठ ,नऊ मिनिटे गाणे ऐकताना काही अर्थ कळत नाही ,पण आनंद कानातून मनात झिरपत रहातो . !(हा माझा अनुभव आहे .)

भारतीय संगीत किती श्रेष्ठ आहे हे असे एखादे गाणे ऐकले कि जाणवते . आपण सध्या करत असलेले दुर्लक्ष , हे देवदुर्लभ गान /श्रावण वैभव गिळंकृत करेल कि काय याची भीती वाटतेय !(आणि तसे झालेतर आपण कर्म दरिद्री ठरू !) आणि त्याच बरोबर कसल्यातरी असंबद्ध ,अभद्र गाण्याना व्वा, व्वा म्हणून टाळ्या वाजवतो याची लाज पण वाटते !

— सु र कुलकर्णी

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच , Bye .

 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..