ह्याचा १-२ मीटर उंच बळकट गुल्म असतो.फांद्या दाट असून त्यावर कापसा सारखे रोम असतात. ह्याची पाने १५-२५ सेंमी लांब व लंबाग्र असतात.ह्यांचा वरचा भाग गुळगुळीत व मागील पृष्ठभागावर कापसा सारखे रोम असतात.
फुल लहान गुलाबी रंगाचे २ सेंमी लांब व ५ सेंमी व्यासाचे द्विधा विभक्त मंजिरी मध्ये दाटी वाटीने उगवणारे.फळ मांसल,पांढरे ३०-४५ सेंमी व्यासाचे असते.
ह्याचे उपयुक्तांग पाने व फुले असून हे चवीला कडू,तुरट,गोड असते.तसेच हे थंड गुणाचे व जड व रूक्ष असते.हे त्रिदोष शामक असून वात व पित्तनाशक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)जखमे मध्ये दुर्गंधीनाश करण्यासाठी फुलांचा उपयोग होतो.
२)डोके दुखी मध्ये देखील प्रियंगुची फुले उपयुक्त आहेत.
३)आमवाता मध्ये ह्याची पाने शेकण्यासाठी वापरतात.
४)प्रियंगु रक्तशुद्धिकर व पित्तनाशक असल्याने रक्तदुष्टी जन्य विकारात उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️Dr Swati Anvekar
Leave a Reply