पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म २५ जानेवारी १९५८ रोजी झाला.
कविता कृष्णमूर्ती या मूळच्या दिल्लीच्या. वयाच्या १४ व्या वर्षी मुंबईला आपल्या बंगाली मावशीकडे आल्या. त्यांना पार्श्वगायिका बनवण्याची मावशीचीच खूप इच्छा होती.
कविता कृष्णमूर्ती यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, खय्याम, राहुल देव बर्मन, ए. आर. रहमान, जतीन ललित, रवींद्र जैन यांसारख्या ज्येष्ठ संगीतकारांबरोबर काम केले, इतकेच नाही तर त्यांना मन्ना डे, हेमंतकुमार, मुकेश, लतादीदी यांसारख्या ज्येष्ठ गायकांबरोबर गाण्याची संधी मिळाली. कविता कृष्णमूर्ती यांचे पती डॉ. एल. सुब्रमण्यम हे व्हायोलिनवादक आहेत. संगीताच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने ते जगभर फिरत. ११ नोव्हेंबर १९९९ रोजी कविता आणि सुब्रमण्यम यांचा विवाह झाला.
कविता कृष्णमूर्ती यांनी भारतीय शास्त्रीय संगीत शैलींमध्ये शिक्षण घेतले असून शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायली आहेत. ‘हम दिल दे चुके सनम’मधले ‘निम्बोडा निम्बोडा’ हे त्यांनी गायलेले गाणे अतिशय अवघड समजले जाते. त्यांनी पतीची ‘फ्यूजन म्युझिक’ची संकल्पना वाढवली. त्यांच्या कार्यक्रमांत त्या त्यांना साथ देऊ लागल्या. अशा कार्यक्रमांमुळे त्यांची संगीताकडे बघण्याची दृष्टी बदलली.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर आधारित असलेली गाणी आणि पतीचे फ्यूजन संगीत आणि व्हायोलिनवादन यामुळे त्यांचे कार्यक्रम खूप रंगू लागले. पतीच्याच प्रोत्साहनामुळे कविताबाई आधी कधीही गायल्या नाहीत अशी गाणी गाऊ लागल्या, संगीतात नवे नवे प्रयोग करू लागल्या. कविता सुब्रमण्यम यांचा स्वतःचा बँड आहे. बँड आहे. कीबोर्ड, गिटार, इलेक्ट्रिक बास, ड्रम्स, भारतीय ताल वाद्ये आणि सगळे वादक असा लवाजमा घेऊन त्या पतीबरोबर जगभर फिरत अस्तात. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि आंतरराष्ट्रीय संगीताचा सुरेख मिलाफ या कार्यक्रमात ऐकायला मिळतो.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply