२२. तिकडे जाऊन आल्यावर हात धुवावेत. हात पाण्याने धुवावेत, पण माती किंवा रखा सुद्धा वापरावी. असेही सांगितलेले आहे. आज साबण वापरला जातो, चेहेऱ्याचा साबण वेगळा, घामाच्या दुर्गंधीचा वेगळा, (एवढं करून घामाची दुर्गंधी येतेच ती झाकली जावी म्हणून वर डिओडोरंट आहेतच ! ) केसांचा वेगळा, पुरुषांचा वेगळा, स्त्रियांचा वेगळा, लिक्वीड सोप वेगळा, वडी वेगळी, दाढीचा वेगळा, फोमदाढीचा वेगळा ! कपड्याचा वेगळा एवढं ठीक होतं ना ! पण त्यातही शालीसाठी वेगळा, सतरंजीसाठी वेगळा, हाताने कपडे धुवायचा वेगळा, मशीनने कपडे धुवायचा वेगळा, रंगीत कपड्यांचा वेगळा, ब्लॅक व्हाईट साठींचा वेगळा.
आता काही दिवसांनी ओठांचा वेगळा, भुवईचा वेगळा असे स्ट्रीप सोप बार पण येतील.
हर्बल म्हणा किंवा आयुर्वेदाचा म्हणा, येऊन जाऊन फेस सगळीकडचा सारखाच ! फुल्ल ऑफ केमिकल.
काय चाल्लंय काय ? सगळे साबण येतायत ते आरोग्याची केवढी काळजी घेऊन ना ?ही सारी देणगी कुणाची ? फक्त पाश्चात्य मल्टीनॅशनल कंपन्यांची सोय.
२३. मल विसर्जन रोज झालेच पाहिजे हा भारतीय दंडक. पण इतर देशात मलविसर्जनाला फार महत्त्व नाही. दोन चार दिवसांनी झालं तरी चालतं म्हणे !
२४. उठल्या उठल्या मलवेग आल्यावर लगेच गेले पाहिजे आणि परत पाच मिनीटात बाहेरही आलं पाहिजे.
२५. मलविसर्जन झाल्यावर शौचानंदाचे सुख मिळाले पाहिजे. हे मानसिक स्तरावरील समाधान.
सकाळी उठल्यापासून ते मल विसर्जन होईपर्यंत किती ठिकाणी आपण अभारतीय आहोत, हे लक्षात येतंय का ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply