MENU
नवीन लेखन...

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक

नमस्कार मंडळी,

आजपासून पुनः एकदा आपल्या भेटीला येतोय. एक गंभीर विषय घेऊन.

गंभीर अशासाठी, की आपल्याला आपल्या अगदी जवळ असल्याने काही गोष्टींचं महत्त्वच लक्षात येत नाही.

ज्या गोष्टीच्या शोधासाठी सर्व पाश्चात्य बुद्धीवंत आमच्या देशात येतात, तीच ही गंभीर गोष्ट आहे. ती म्हणजे आपले भारतीयत्व !

खरंच आहे. भारतामधे अनेक विद्वान होऊन गेले. त्यांनी अनेक शोध लावले. अनेक ग्रंथ लिहिले गेले. पुढे परकीय आक्रमणामधे अनेक ग्रंथ जाळले गेले. पण मुळातील ज्ञान कधीही नष्ट होत नाही, ते संस्कृतीच्या रुपाने काळाच्या गर्भात कुठेतरी परत जन्माला येत असते.

हा मुळ भारतीय संस्कृतीचा धागा आज हरवत चाललाय, तो शोधायला पाश्चात्य भारतात येताहेत, जगातल्या अनेक देशात भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू आहे. त्यासाठी जे करावे लागेल ते करण्याची पाश्चात्यांची तयारी आहे.आणि आपण मात्र नित्याच्या सर्व भारतीय गोष्टी विसरत आहोत.

मुळात आरोग्यटीप लिहायला सुरवात केली ती, याच एका मुद्याला धरुन.

जिथे हरवलं आहे, तिथे जाऊन शोधावं, म्हणजे ते सापडतंच. हा सामान्य सिद्धांत आहे.

आमचे मूळ आरोग्य आमच्या भारतीयत्वात होते. पण तेच विसरल्यामुळे आम्ही आरोग्यापासून लांब गेलो होतो. पाश्चिमात्य विचारांचे आपण एवढे गुलाम झालो की, आमचा मूळ आयुर्वेद देखील आम्ही विसरून गेलो. त्याची नाळ तुटली आणि आरोग्य हरवले.

आदरणीय राजीवभाई दीक्षितजी यांच्याबरोबर राहिल्याने आरोग्याकडे पहाण्याची नवी दृष्टी प्राप्त झाली. ऑक्टोबर महिन्यातील एका टीपेमधे याचा ओझरता उल्लेख केला होता. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण किती ठिकाणी अभारतीय पद्धतीने वागतो, याची सहजपणे सूची केली असता तब्बल एकशेसत्तावीस ठिकाणी आपण बदललो आहोत, असे लक्षात आले. कमीत कमी ही एकशे सत्तावीस ठिकाणे कोणती ते शोधण्याचा जरा प्रयत्न करूया. (आता बदलता येणं जरा कठीणच आहे असं काही जणांना वाटेलही पण ) जे योग्य वाटते ते सांगायला तर हवे. नाहीतर पुढील पिढीला कळणार तरी कसे ?

राष्ट्रभक्ती म्हणजे काय असते,
वर्षातून दोन वेळा, ठेवणीतले कडक इस्त्रीचे पांढरे कपडे घालून झेंडावंदन केले, म्हणजे आम्ही राष्ट्रभक्तीने ओथंबून गेल्यासारखं वाटतं.
पण व्यवहारात मात्र जिथे जिथे पाश्चात्य आचार विचार उच्चार वापरता येतील तिथे तिथे ते बिनदिक्कत वापरतो. मग ते साधे हस्तांदोलन असो किंवा संदेशासाठी वापरली जाणारी आंग्ल भाषा असो. मुळात विचार भारतीय असला तर आचार आणि उच्चार सहजपणे बदलले जाऊ शकतात.

हा सगळा इंग्रजांच्या गुलामीचा परिणाण आहे. आपण मुद्दामच पाश्चात्य विचाराने वागतो असे नाही, पण सहजपणे अंगवळणी पडत गेले, आणि भारतीय विचारांची गाडी कुठे पश्चिमेला वळत गेली, कळले देखील नाही.
राजीवभाई म्हणतात, त्याप्रमाणे सहा मुलभूत गोष्टी आहेत, ज्यामध्ये आपण सहजपणे बदल स्विकारत गेलो त्यामुळे आपल्या पुढच्या रक्ताला सुद्धा तीच सवय लागली.

1.आमची स्वतःची भारतीय विचारांची कायदे आणि न्याय व्यवस्था
2.आमची स्वतःची भारतीय विचारांची राज्य चालवणारी सरकारी यंत्रणा
3.आमची स्वतःची भारतीय विचारांची अर्थ व्यवस्था
4.आमची स्वतःची भारतीय विचारांची कृषी व्यवस्था
5.आमची स्वतःची भारतीय विचारांची शिक्षण व्यवस्था
आणि
6.आमची स्वतःची भारतीय विचारांची आरोग्य यंत्रणा.

या सर्व व्यवस्था जोपर्यंत पूर्णपणे भारतीय विचारांच्या होत नाहीत, तोपर्यंत भारत पुनः सोने की चिडीयावाला देश बनणार नाही. असे राजीवभाई म्हणायचे ते काही खोटे नाही.

चला !
एक पाऊल उचलूया.
आरोग्य व्यवस्था बदलूया.
आपल्याला जिथे शक्य आहे, तिथे भारतीय विचारांचे बनूया.
नवा भारत घडवूया !
२६ जानेवारी २०१८

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..