नवीन लेखन...

अभिनंदन पा !

भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास मोठा रंजक आहे पण त्याच बरोबर बदलत्या काळानुरुप स्वरुप पालटलेल्या भारतीय चित्रपट सृष्टीचा वर्तमान काळ देखील रंजक म्हणता येईल भारतीय चित्रपट सृष्टीने भारतीय रसिकांसाठी केवळ मनोरंजनाची कवाडे उघडली नाहीत तर समाज प्रबोधनाच्या कार्यासही हातभार लावला आहे बुध्दीमान लेखकांच्या दर्जेदार कलाकृतीवर कुशल दिग्दर्शकांनी व अप्रतिम अभिनयाने कलाकारांनी साकारलेल्या भारतीय सिनेमांची यादी खुपच मोठी आहे यात कोणत्याही एक दोन सिनेमांची वा अभिनेता वा अभिनेत्रींची नावे घेवून इतरांवर अन्याय करण्या सारखे होईल पण तरीही या मनोरंजन सृष्टीचा पाया रचणार्‍या, त्याला उभारणार्‍या व त्यावर किर्तीचा कळस चढविणार्‍यां मध्ये अनेक दिग्गजांची नावे कोरली गेली आहेत हे आठवण्याचं कारण एवढच की दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सिनेसृष्टीसाठी प्रतिष्ठित समजले जाणारे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत अण् या पुरस्कारांमध्ये एका महानायकाचे एक नाव आहे तो महानायक म्हणजे अमिताभ बच्चन! आताच्या पिढीला व त्या अगोदरच्या पिढीला हे नाव अगदी ओठावर सहज येते. सुरवातीच्या सिनेसृष्टीच्या सुवर्णमय काळातील राजकपूर, दिलीप कुमार, देव आनंद, प्रदीप कुमार, अशोक कुमार, डेव्हिड, ओम प्रकाश, जीवन, अजित, प्रेम चोप्रा, सुजीत कुमार, शम्मी कपूर, मनोज कुमार आदि कलावंतांनी सिने रसिकांना वेड लावले होते या कलाकारांच भाग्य एवढं थोर होतं की यांच्या सोबतीला असलेले सहकलाकार ज्या कलाकृतीसाठी ते काम करीत असत ते निर्माण करण्यात दिग्दर्शक निर्माते व तंत्रज्ञ कलावंतांचा सहभाग असे तो देखील उजळ असायचा या कलाकारांच्या चित्रपटाचं संगीत अन् गीत हे अजरामर ठरत असे अन् त्याचा गोडवाआजही टिकून आहे. आजच्या काळात ही बाब अमिताभ बच्चन या महानायकाने अधोरेखित केली आहे खर्‍या अर्थाने बॉलीवूडच्या किर्तीत प्रामाणिक योगदान देणारा एक महान कलावंत म्हणून अमिताभ बच्चन यांची ख्याती आहे.

एक उत्कृष्ट कलावंत म्हणून ते परिचित आहेतच. पण एक उत्कृष्ट व्यक्ती माणूस म्हणूनही त्यांची ख्याती आहे. अभिनयाच्या बाबतीत रसिकांना खिळवून ठेवणार्‍या या कलावंताने कलाकृतीचं खरं सोनं केलय केवळ वास्तववादी गुंतागुंतीच्या समाज प्रबोधन करणार्‍या चौकटीतील सिनेमात अभिनयाची छाप पाडून आपली प्रतिमा तयार करण्यापेक्षा बहारदार लोकांना स्वत:ची दु:ख विसरायला लावणार्‍या करमणूक प्रधान चित्रपटातून सर्वांग सुंदर अभिनय करणार्‍या अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांची लोकप्रियता म्हणूनच टिकावू आहे. मग “जंजीर” असो की आत्ताचा “पा” वा “अभिमान” असो की नजिकच्या काळातील “बागबान” अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन रसिकांना भावले आहे व म्हणूनच त्यांनी आपल्या लोकप्रियतेचा टीआरपी टिकवून ठेवला आहे. इथे केवळ या राष्ट्रीय पुरस्कार मिळविण्याच्या निमित्ताने त्यांच्या अभिनया बद्दलच नव्हे तर अमिताभ बच्चन एक माणूस म्हणूनही लिहिल्या शिवाय राहवत नाही दुरदर्शनच्या एका वाहिनीवर “कौन बनेगा करोडपती” या मालिकेतून या महानायकाचे माणूस म्हणून दर्शन घडले. दिग्दर्शकाने जे करायला लावणारा पडद्यावर ते करणारा अमिताभ त्यावेळी प्रत्यक्ष स्वत: किती काटेकोर, प्रामाणिक, मुत्सद्दी, शिस्तप्रिय अन् प्रेमळ आहे हे सार्‍या भारतीयांनी अनुभवले तेव्हा पासून अमिताभ बच्चन विषयीची रसिकांची कृतज्ञता ही खुपच बळकट झाली त्यातील आदर आणखी उजळ झाला त्यांच्या विषयीच्या प्रेम भावना खुप सुथृढ झाल्यात कौन बनेगा मध्ये हॉटसीटवर अमिताभ बच्चन यांच्या समोर व प्रेक्षक गॅलरीत बसलेल्यांना तर न् भुतो न् भविष्यती अशा आनंदमयी अनुभवाची प्रचीती आली ती त्यांच्या बोलण्यातूनच जाणवत होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांचे चित्रपट फार मोठ्या प्रमाणात सिनेमागृहात झळकले नाहीत पण “बागबान” मधील त्यांची रिएन्ट्री अन् “पा” मधील आगळा वेगळा अभिनय आजच्या पिढीतील रसिकांना भावून गेला. राष्ट्रीय पुरस्कार देवून या महानायकाचा गौरव केल्या बद्दल खरतर निवड समितीचच अभिनंदन करायला हवं! या महानायकाला भविष्यात उज्वल यश तर मिळोच पण दिर्घायुरोग्य लाभो ही शुभकामना!

— अतुल तांदळीकर

Avatar
About अतुल तांदळीकर 11 Articles
writing is my hobby, jornalisum is my vision. I like reading stories, news articles.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..