तू असतोस तेव्हाच फक्त जगणं असतंएरवी फक्त सावली पांघरते जगण्याची कधी कधी ती मागे येते आशाळभूतपणे मी जगण्यांत रस घ्यावा म्हणून विनवण्या करीत, कधी मुद्दाम पायांत अडखळते मला पाडण्यासाठी सावलीचीही ठेच लागावी इतकी मी हळवी झाली आहे हे माहीत असतं तीला, तर कधी माझ्यापुढे धावत राहते जगण्याची सावली मला सोडून जायच्या प्रयत्नात निराश होवून तू असतोस तेव्हा सावलीवर पाय रोवून मी कैद करते जगण्याला अधाशीपणे जगुन होते जेव्हा निसटून जाईल ती तुझ्यादेखत पायांखालून तेव्हा समजेन, तू असूनही तू नाही आहेस आणि इतकं अंधारुन आलेलं असेल कि ना मी तूला दिसेन ना माझी सावली.
— सुषमा एडवण्णावर
Leave a Reply