मुळचे पंजाबचे असलेले राज खोसला हे शास्त्रीय संगीत शिकलेला गायक म्हणून मुंबईत आले होते ते गायक बनायला. त्यांचा जन्म ३१ मे १९२५ रोजी झाला. काही काळ आकाशवाणीवर म्युझिक विभागात काम ही केले पण बॉलीवूड हीच त्याची खरी कर्मभूमी ठरली. या राज खोसालावर नजर पडली देव आनंद यांची आणि त्यांनी राज खोसला यांना गुरु दत्तचा असीस्टंट बनवले.
१९५४ मध्ये देव आनंद यांच्या बरोबर राज खोसालांनी “मिलाप” बनवला पण हा चित्रपट तिकीटबारीवर सपाटून आपटला. पण मग सीआयडी आला आणि राज खोसलांच्या विमानानी टेक ऑफ घेतला. काला पानी, सोलवा साल, बंबई का बाबू, एक मुसाफीर एक हसीना, वोह कौन थी, मेरा साया, दो बदन, अनिता, चिराग, दो रास्ते, शरीफ बदमाश, कच्चे धागे आणि अनेक असे अप्रतीम चित्रपट राज खोसला यांनी बनवले.
अमिताभ बच्चन यांना घेऊन त्यांनी एक चित्रपट केला तो म्हणजे दोस्ताना. मेरा साया हा राज खोसला यांचा सर्वात गाजलेला चित्रपट.
राज खोसला यांचे निधन ९ जुन १९९१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply