कौन बनेगा करोडपती
अतिशय छान असा हा कार्यक्रम आहे याबद्दल वादच नाही.
पण थोडा फार बदल केला तर नक्कीच बघायला मजा येईल.
१) जर प्रश्न तो मनुष्य करत असलेल्या व्यवसायाबद्दल विचारले तर नक्कीच त्याच्या ज्ञानात भर पडेल आणि जरी तो जिंकू शकला नाही तरी आपण आपल्या पेशात किती मागे आहोत आणि आपण स्वताला अजून किती प्रगत केले पाहिजे याची नक्कीच कल्पना येईल.
२) जनरल माहिती असणे गरजेचे आहे पण दैनंदित जीवनात आवश्यक नाही.
३) लोंकाचे मत जेव्हा घेतले जाते त्यावेळी एक अजून Option असणे आवश्यक आहे आणि तो म्हणजे माहित नाही. त्यामुळे किती लोकांना ते उत्तर माहित आहे याचा अंदाज येईल.
४) Expert हे माहितगार लोकांनाच बोलावले पाहिजे जसे MPSC , UPSC झालेले उमेदवार, हिरो कशासाठी ?
५) एक प्रश्न आपल्यासाठी सुद्धा असतो त्यावेळी SMS चे रेट दिले जातात पण दे रेट किती आहेत हे समजत देखील नाही त्यामुळे मोठा font घेऊन जर ते दाखवले तर फार बरे होईल.
— सचिन सदावर्ते
Leave a Reply