दाहोळी – दहा ओळींची रचना.
असेन असा मी
न कळेल वार्याला
पापण्या गळल्याची बातमी.
रडेन असा मी
न कळेल डोळ्यांना
हृदय भंगल्याची बातमी.
हसेन असा मी
फुलतील गालांवर कळ्या तुझ्या.
नसेन असा मी
भिजतील जोडव्यांच्या कडा तुझ्या.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply