सांगते मी गुपीत तुला रे
सांगू नको तू कुणाकडे
नजरेत तुझ्या गुंतता नजर
का पाहू मी या जगाकडे ।
एक शब्द मज एक ध्यास
अशी नजरेत नजर राहू दे
जन्मोजन्मी साथ सजणा
सदैव अशीच राहू दे ।
हात तव मज हाती असता
अन नजरेत माझ्या नजर तुझी
भासते मज जग जिंकीले मी
असता मजला साथ तुझी ।।
सुरेश काळे
मो.9860307752
सातारा
७ जुन २०१८