उट्टे १९८६ : पहिल्या सामन्यात ५३ धावांवर सर्वबादची नामुष्की ओढवलेल्या (पहा : २८ ऑक्टोबर, अनपेक्षित हार) वेस्ट इंडीज संघाने दुसर्या सामन्यात पाकिस्तानचा एक डाव राखून दणदणीत पराभव केला. दहा वर्षांत पहिल्यांदाच वेस्ट इंडीजच्या संघामध्ये दोन रकीपटू खेळताना दिसले पण रॉजर हार्पर आणि क्लाईड बट्स यांच्या वाट्याला अवघे एकच षटक आले. ल्कम मार्शल, टोनी ग्रे आणि कोर्टनी वॉल्श या वेगवान गोलंदाजांनी फिरकीपटूंना तशी संधीच दिली नाही. पाकचा पहिला डाव ३१ तर दुसरा अवघ्या ७७ धावांवर संपला. रीस भर म्हणून एक चेंडू तोंडाला लागल्याने कासीम उमरला दुसर्या डावात निवृत्त वे लागले.
खिलाडू हॅडली १९८५ : अतुलनीय रिचर्ड हॅडलीचा एक सनसनाटी दिवस. ब्रिस्बेनमध्ये पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ५२ धावांमध्ये ९ तर एकूण १२३ धावांमध्ये १५ फलंदाजांना तंबूची वाट दाखवीत हॅडलीने ऑस्ट्रेलियाची वाट लावली. किवींनी डावाने विजय मिळविला. जिम वॉगन ब्राऊनच्या गोलंदाजीवर एक अवघड झेल स्वतः हॅडलीने टिपला. वॉगन ब्राऊनचा तो पहिलाच कसोटी बळी ठरला. या निःस्वार्थीपणासाठी ‘तो’ झेल शतकातील सर्वोत्तम झेल मानला जातो. आत्ताचा कांगारूंचा संघ पाहून विश्वास बसणे कठीण आहे पण त्यावेळचा कांगारूंचा संघ कुणीही यावे आणि हरवून जावे (यात हॅडलीचे श्रेष्ठत्व नाकारण्याचा हेतू नाही) असा होता. वीस सामन्यांपैकी एके काळी कांगारूंचा संघ केवळ एकच सामना जिंकू शकला होता.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply