मी त्यांना त्यांच्या साध्या राहणीमानाविषयी विचारले, तर त्यांनी मला टॉलस्टॉयची एक कथा ऎकविली ती अशी, “एक शेतकरी होता. त्याला कोणीतरी सांगितले की, बाजूच्या गावात जमीन खूप सुपीक आहे. तिथे जमीन घेतली तर तुला खूप कमाई होईल.शेतक-याने तसे केले. काही दिवसांनी त्याला दुस-या काही गावांची माहिती मिळाली. तिथेही त्याने जमीन घेतली. तो अजून श्रिमंत झालाअ. असे करतकरत तो एका गावात आला. तिथला पाटील त्याला म्हणाला, सूर्यास्तापर्यंत या गावाला तू पूर्ण फेरी मारलीस, तर तुला सर्व जमीन फुकटात मिळेल. पण फेरी पूर्ण केली पाहिजे. शेतकरी जोरात धावला. त्याला शक्य होईल तेवढी मोठी फेरी मारण्याची त्याची इच्छा होती. जसजशी संध्याकाळ होत आली तसा तो फेरी पूर्ण करण्यासाठी वेगाने धावू लागला. सुर्य क्षितिजावर अस्तास जात असतांना त्याची फेरी पूर्ण होऊन तो अनेक मैल जमिनीचा मालक झाल. पण त्याने ही प्रदक्षिणा पूर्ण केली अन तो धापा टाकून कोसळला व मृत्युमुखी पडला. ग्रामस्थांनी त्याला ६ बाय २ फुटाचा खड्डा खणून पूरले. त्यावेळी पाटील म्हणाले “खरं तर त्याला एवढ्याच जमिनीची गरज होती.”
एका दिशेचा शोध, संदीप वासलेकर, राजहंस प्रकाशन, पुणे.
या वरील संवादात विचारणार व्यक्ती आहे स्ट्रेटेजिक फोरसाईट ग्रुपचे संस्थापक आणि लेखक संदीप वासलेकर. तर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणारा व्यक्ती आहे हान्स एकदाल, एक जगविख्यात उद्योजक आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीचे माजी अध्यक्ष. ७० देशांमध्ये त्यांचा कारभार होता. लेखकासोबत कॉफी पित असतांना, फोनवर बोलता बोलता या माणसाने न्युझीलंडमधील एक कंपनी त्यांनी विकत घेतली असे हे व्यक्तिमत्व…एवढी श्रीमंती असणा-या माणसाचे राहणीमान अगदी साधे व सरल..? पत्नी व मुले पण दुसरीकडे नोकरी करतात. त्यांनी देखील स्वःतची ऒळख आपल्या आपाल्या उद्योग क्षेत्रात
निर्माण केलेली आहॆ. मला पण प्रश्न पडला कसे
शक्य आहे? पण आपल्या आणि पाश्चिमात्यांच्या विचारातील बहूतेक हा फरक असावा. असो यासारखे असे अविस्मरणीय अनुभव लेखकाने खुले करुन दिलेले आहेत त्यांच्या ’एका दिशेचा शोध’ या पुस्तकात.
याच्या अगदी ऊलट परिस्थिती आपल्याकडे आहे. दिसत नाही ती श्रीमंती कसली असा भारतीय विचार आणि समज. अशा शेतक-यांची आपल्या देशात वानवा नाही. गरजहिनता जोवर आपल्या अंगी भिनत नाही जोवर हा विचार आपल्याकडे वाढत नाही, रुजत नाही तोवर आपल्याला विकसीत होता येणार नाही.
अर्थतज्ञ भिमराव आंबेडकर, रंगकर्मी निळू फुले, कवी नारायण सुर्वे, लेखक विष्णू खांडेकर, गायक सुधीर फडके, संगीतकार रामचंद्र चितळे, गझलसम्राट सुरेश भट, शिक्षक सदाशीव साने, पत्रकार गंगाधर टिळक, समाज सुधारक ज्योतीबा फूले, लोकसेवक यशवंत चव्हाण, राज्यशास्त्रज्ञ भास्कर भोळे, कलाकार गणपत पाटील, किर्तनकार डेबूजी महाराज, संत मुरलीधर आमटे असे गरजहीनतेचा संदेश देणा-या महापुरुषांचा वारसा आपल्याला लाभलेला असतांनाआपण अजूनही भौतिक सुखाचा का म्हणून एवढा पाठलाग करतो ते मला कळत नाही . विचार बदला देश बदला असे सांगणारे एका दिशेचा शोध हे पुस्तक . आपणही वाचा.
आपल्याला आवश्यक आहे तेवढ्याच सुख साधनांचा वापर करावा, इच्छा धरावी, जास्तीच गरजूंना वाटावं-
– मोहनदास करमचंद गांधी.
— तुषार भामरे
Leave a Reply