प्रेम म्हटलं कि, फक्त आपल्या ड़ोळ्यासमोर एक मुलगा आणि एक मुलगी येते.याचं कारण आपल्याला प्रेम या शब्दाचा अथच कळला नाही.प्रेम हे मुलाचं मुलीवर, भावाचं बहिणीवर, आईचं मुलावर, नवर्याचं बायकोवरही असु शकतं.पण मुलाचं मुलीवर असणार्या प्रेमाकड़े लोकांचा बघण्याचा दष्टीकोनंच वेगळा आहे.त्याला कारणही तसंच आहे.आज प्रेम म्हणजे तरुणांसाठी फक्त एक वासना आहे.ऊबेसाठी
शेकोटी पेटवायची ऐवढ़ाच ऐक हेतु.आणि याच कारणामुळे प्रेम विवाहास नेहमि विरोधंच दिसुन येतो.सच्चे प्यार कि कोई किंमत नही असं म्हणण्यालाही कारण हेच आहे.एखाद्याच्या आयुष्याशी खेळायचं का आणि कशासाठी? प्रत्येकाने जर का एकच गोष्ट लक्षात घेतली कि, जर का आपल्या बहिणीच्या जिवनाशी जर का असं कोणी खेळलं तर आपल्याला चालेल का? तर त्याचे ऊत्तर नेहमि नाही हेच असेल.साथीदार निवड़ताना विषेश करुन मुलींनी खुप सावधगिरी बाळगली पाहिजे.योग्य साथीदार निवड़णं हिच तर यशस्वी जिवनाची पहिली पायरी आहे.योग्य वेळी योग्य साथीदार मिळणं हि एक भाग्याची गोष्ट आहे.खरं तर आपल्या संस्कतिचाच आपल्याला विसर पड़ला आहे.आपली संस्कती काय हेच आपण विसरलो आहोत.विवाह हे एक पवित्र बंधन आहे.या बंधनात अड़कणं फार सोपं असतं पण टिकुन रहाणं फार कठिण.म्हणुन मि एवढ़ंच सांगेन कि,प्रेमाची भुक ठेवु नका तर सगळ्यांना प्रेम भरवा तुमची भुक आपोआप भागेल.
— प्रमोद पाटील
Leave a Reply