लक्ष आपले जात असते, सदैव प्रभूकडे
मार्ग सारे ठरलेले, जे मिळती तिकडे….१,
‘को S हं’ शब्दाचा निनाद होतो, प्रथम मुखातून
जन्मताच तो प्रश्न विचारी, “मी आहे कोण?”….२
मार्ग हा तर सुख दु:खाने, भरला आहे सारा
राग लोभ मोह अंहकार, याचा येथे पसारा…३,
वाटचाल करिता यातून, कठीण होवून जाते
जीवन सारे अपूरे पडून, अपूर्ण ज्ञान मिळते….४
आयुष्य तुमचे थोडे असूनी, काळ वेळीच जाणावा
मिळेल जो क्षण तुमचे हातीं, प्रभूसाठी तो असावा….५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply