पाखरांचा थवा झाडावर जमला
कलाकल कलकलार करु लागला
पक्षी विविध जातीचे पोशाख विविध रंगाचे
आकार वेगळी भाषा वेगळी
गाणी गप्यात रंगतात कसे
भांडतात कसे खेळतात कसे
मिनूला कोडे पडले असे
आई बाबांनी प्रश्नाला डावलले
बाईंनी ऊत्तर मजेत दिले
पक्षांची शाळा रोज
भरते
गणवेशाचे बंधन नसते
अभ्यासाचा ताप नसतो
पाटी दप्तराचे ओझे नसते
वेगळ्या जाती तरी भाशा जाणतात
हासत खेळत मजेत बागडतात
त्यांची आपली वेगळी रीत
ज्ञनाने पदवी मिळवण्यातच तुमचे हीत
हसा नाचा तुम्ही मजा करा पण
ज्ञन मिळवण्याचे ध्येय धरा.
— सौ. सुधा नांदेडकर
Leave a Reply