नवीन लेखन...

स्वर्गातही सोशल मिडीया साकारणार

मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते. मराठीसृष्टीसाठी हा माझा पहिला लेख. स्वीकार करावा.

प्रकाश तांबे – 8600478883


पृथ्वीवरच्या सोशल मिडियाची खबर काही चुगलखोर आत्म्यांनी स्वर्गात पोहोचवली. एक दोन, ए ग्रेड अप्सरांनी नारदाच्या मदतीने लगेच इंद्राचे कान भरले. मानव निर्मित सोई सुविधांचे अनुकरण देवाधिकांनी करण्याविषयी इंद्राच्या मनात थोडी चलबिचल झालीही परंतु, ” स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाचा दरबारात इफेक्टीव्ह कम्युनिकेशन टुल म्हणून वापर करुन आपण सर्व अप्सरांच्या हलचालींवरही लक्ष ठेउ व सतत सर्वाच्या टचमधे राहू शकु ” या स्वार्थी हेतूने इंद्रानी स्वर्गातल्या सोशल मीडियाला तत्वत: होकार दिला आणि सर्व अप्सरांची मीटिंग बोलावली.

त्याच्या दरबारातल्या २६ अप्सरांपैकी उर्वशी, तिलोत्तमा, मेनका आणि रंभा या नृत्य-संगीत कलांत विशेष नैपुण्य असलेल्या अप्सरांनी ” कोणत्याही क्षणी नृत्याविष्कार सादर करावा लागेल” या शंकेनी नउवारी नेसुन पहिल्या लायनीतल्या जागा पटकावल्या.

इंद्रदेवानी सोशल मिडीयाचे महत्व तसेच फेस बुक व व्हाँटस् अँपची कार्यपध्दती समजवुन दिली आणि ग्रुपच्या डीपीसाठी सर्व अप्सरांचा एकच ग्रुप फोटो लावला असता पण फारच गिचमिड होईल म्हणुन तसे न करता काँटँक्ट लिस्टमधील अल्फाबेटीकल आँर्डरप्रमाणे एकेक अप्सरा एक दिवसा आड कव्हर करु असे प्रपोज केले. परंतु, इंग्रजी आल्फाबेटप्रमाणे ” उर्वशी ” फारच मागे पडत असल्याने ऊर्वशीने अक्षरश: थयथयाट केला आणि मराठी काँटँक्ट लिस्टचा हट्ट धरत, सभात्यागाचा इशारा दिला.

इंद्राने हट्ट मान्य केला व एक व्हाया मीडिया शोधुन उर्वशी, तिलोत्तमा, मेनका व रंभा या अप्सरांचे डीपी मराठी बाराखडीप्रमाणे आणि अजगंधा, कपिला, रक्षिता, हिमा, हेमा, क्षेमा, वगैरेंं, वगैरेंचे डीपी रँडम पध्दतीने घेण्यावर सर्व उपस्थितांची मंजूरी मिळवली. सहाजीकच डीपीसाठी उर्वशीला अग्रक्रम मिळाल्याने, तिलोत्तमा, मेनका आणि रंभा यांचे नाकाचे शेंडे लाल झाले.

इंद्रसभेमधे पुढचा महत्वाचा मुद्दा कंटेंटविषयी होता. टेक्स्ट, आडिओ विषयी सर्वांचे एकमत झाले. परंतु व्हिडीओ शेअरींगचा मुद्दा येताच मेनकाने ( विश्वामित्राचे नावही ओठावर येउ न देता) व्हिडीओ प्रसारण वा शेअरींगला कडाडून विरोध करत इंद्राला व्हिडीओ शेअरींगच्या बंदीसाठी शपथ घातली आणि स्वतः ची बाजु सेफ केली. तिलोत्तमा आणि रंभा, मेनकेच्या या टोकाच्या विरोधानी बुचकळ्यात पडल्या आणि काही तरी काळबेर असल्याच त्यांना जाणवल. इंद्राने चपळाईने विषयाला बगल देउन मला हवं तेंव्हा कोणाचाही फोन स्वीचाँफ किंवा औटाँफ रेंज लागला तर त्या अप्सरेला ग्रुपमधुन तात्काळ एग्झिट व्हाव लागेल अशी तंबी दिली.

” नारायण उवाच ” या सदराखाली नारदमुनींना रोजच्या मनोरंजनाची जबाबदारी देण्यात आली. तसेच, डेटा ट्रान्सफरविशयी विशेष खबरदारी म्हणून ब्रह्मदेव आणि यम यांच्या आँफिसमधून जन्म-मृत्यूविषयी बातम्या पृथ्वीपर्यंत लीक होउ नयेत यासाठी तेथील स्टाफचा सोशल मीडियाचा अँक्सेस रेस्ट्रिक्ट केल्याचे व त्याएवजी त्याना यु ट्युब व गेम्ससाठी फ्री अनलिमिटेड अँक्सेस दिल्याचे जाहीर झाले.

सुरुवातीला हँड होल्डिंगसाठी किंवा हँडस्आँन ट्रेनींगसाठी कोणीतरी एक्सपर्ट लागेल असं मत रंभा व तिलोत्तमेने मांडल्यावर, अँपल टेक्नालाजी चालणार असेल तर अलिकडेच आपल्या रोलवर आलेल्या स्टीव्ह जाँबज् कडे शब्द टाकतो असे आश्वासन इंद्राने दिले.

इंटरनेट कनेक्टिव्हीटी, स्मार्ट फोनचा ब्रँड, मेसेंजर, सर्व्हर फिजिकल प्लेसमेंट या विषयीही सांगोपांग चर्चा होउन स्टीव्ह जाँबज् याही जबाबदार्या संभाळतील असे मत इंद्राने नोंदवले.

व्हॉट्सअप का फेसबुक या विषयी निर्णय लवकरच घेऊ पण पोस्ट इकडच्या तिकडे होउ नये या साठी काय वाट्टेल ते झाल तरी नारदाला अँडमिन होउ देणार नाही आणि वेळ आलीच तर काही दिवस मीच अँडमीन राहीन असेही इंद्राने जाहीर केले.

— प्रकाश तांबे
8600478883

 

Avatar
About प्रकाश तांबे 45 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..