पाकिस्तानी लष्कराचे हेरखाते काही मौलवी व दहशतवादी गट आणि त्यांना समर्थन देणारे मूठभर विचारवंत यांच्या विचाराने चालते. पाकिस्तानी लष्कर, हेरखाते व काही प्रतिष्ठित विचारवंत हे दहशतवादी संघटनांचे पुरस्कर्ते आहेत. पण आपण त्यांच्यापेक्षाही सर्वसामान्य पाकिस्तानी लोक व तेथील धर्म याला जबाबदार धरतो. ही मोठी घोडचूक आहे. सामान्य पाकिस्तानी लोकांना भारताबरोबर मैत्री हवी आहे. भारतीय नागरिकांना लोक नेहमीच प्रेमाची वागणूक देतात. तेही लोक पाकिस्तान लष्कर व नेते मंडळींच्या कारवायांनी कंटाळले आहेत. त्यांनाही त्यांच्या लष्कराकडून सुटका हवी आहे. धर्माच्या नावावर जो भारतविरोधी प्रचार चालतो, त्यात धर्माचा खूप कमी संबंध आहे. तेथील सर्व कडव्या धार्मिक संघटना, पाकिस्तानी सैन्य, सरकार आणि सरकारी हस्तक यांच्याच पाठिंब्यावर उभ्या आहेत.
संदर्भ-एका दिशेचा शोध, लेखक-संदिप वासलेकर,प्रकाशक-राजहंस प्रकाशन, पुणे२०१०.
पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी भारतातील ठिकाणांवर हल्ले केल्यास आपण पाकिस्तानी नागरिकांनाही जबाबदार धरतो. आपल्या वर्तमानपत्रांतून त्यांवर टिका होते, मग आपण पाकिस्तानी कलाकारांवर, क्रिकेट सामन्यांवर बहिष्कार घालतो लोकशाही तत्त्वांनूसार हे योग्य असले तरी पाकिस्तानात लोकशाही ही अगदीच नाममात्र प्रमाणात आणि दिखावटी आहे. त्यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी भारतात हल्ले केल्यास त्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. कारण मुळातच पाकिस्तानी नागरिकांचा देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग नसल्यात जमा आहे. फक्त काही कडव्या धार्मिक गटांच्या विचारसरणीला डोक्यात घेउन आपण तिथल्या धर्माला या सर्व कट-कारस्थानासाठी जबाबदार धरतो. आपल्या अशा वागण्याने मात्र सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकाला मात्र चुकीचा संदेश जातो आणि दोघांत संवादाकरता अनुकूल असे वातावरण निर्माण होत नाही. अनेकदा आजुबाजूच्या परिस्थितीमुळे आपण एकमेकांची मने नकळतपणे दुखावून बसतो. पाकिस्तानातील प्रशासनावर तेथील लष्कर, विचारवंत आणि सरकारचा प्रामुख्याने प्रभाव आहे. हा प्रभाव मोडून काढणे तेथील सामान्य जनतेला शक्य नाही ही बाब आपण लक्षात पाहिजे. याप्रकारच्या
सामान्य माणसाला अज्ञात असलेल्या अनेक बाबी संदिप वासलेकरांनी आपल्या ’एका दिशेचा शोध’ या पुस्तकात उघड केल्या आहेत.
याविषयी तुम्ही फेसबूकवरही माहिती वाचू आणि चर्चा करु शकता. विषय आवडल्यास “Like”वर जरूर क्लिक करा. http://www.facebook.com/pages/Eka-Dishecha-Shodh/126104087443744
— तुषार भामरे
Leave a Reply