नवीन लेखन...

सामाजिक शिष्टाचार – फोनवर बोलण्याचे शिष्टाचार

कार्यालयीन कामकाज तसेच समाजात वावरताना कोणत्या शिष्टाचारांचे पालन केले पाहिजे याविषयीचा एक प्रदीर्घ लेख सुप्रसिद्ध लेखिका

“माणिक खेर” यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिला होता. याच लेखावर आधारित ही क्रमश: मालिका.


फोन आणि मोबाईल यांचा वापर कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी करतानाही काही भान बाळगायला पाहिजे. कसे ते बघूया…

फोनवर बोलण्याचे शिष्टाचार

१) फोन वाजताच लगेच उचलावा. दोन किंवा तीन वेळेपेक्षा जास्त वेळ वाजू देऊ नये. जेथे स्वयंचलित ऑपरेटर असतो तिथे अनेकदा दुसर्‍याला

फोन जोडला जाईपर्यंत संस्थेच्या जाहिराती लावल्या जातात. वर्तमानपत्रांच्या फोन यंत्रणेत तर हे हमखास आढळून येते. ऐकणार्‍यावर अशी

जबरदस्ती करणे अत्यंत चुकीचे आहे. काही ठिकाणी टेलिफोन ऑपरेटर फोन जोडून देण्यास फार वेळ ताटकळत ठेवतात. आपल्याला असे

केलेले आवडेल का असा फोन यंत्रणा सांभाळणार्‍यांनी विचार करावा.

२) फोनवर बोलताना दुसर्‍याचे म्हणणे पूर्ण ऐकून मग बोलावे. दोघेही एकाच वेळेस बोलू लागले तर कोणाचेच बोलणे दुसर्‍यास समजत नाही.

तसेच फोनवर सावकाश व स्पष्ट बोलावे. विशेषत: आकडे व नावे सांगताना तर हे जास्तच आवश्यक आहे.

३) फोनवर स्पेलिंग सांगताना सर्वसाधारण व प्रचलित असलेल्या शब्दांवरून स्पेलिंग सांगावे. यासाठी टेलीफोन डिरेक्टरीमध्ये A to Z पासून सुरू

होणार्‍या काही शब्दांची यादी दिलेली असते. पण आजकाल डिरेक्टरीचा वापर नाममात्र असतो. जसे a for apple, b for ball किंवा गावांच्या

नावावरून स्पेलिंग सांगितले तर ऐकणार्‍याला ते चटकन समजते. परंतु परदेशी लोकांना गावांची नावे सांगायची झाल्यास सर्वतोमुखी असलेली

विशेषत: त्यांच्या देशातील गावांची नावे सांगावीत. आपल्या देशातील L for Latur C for Chennai चे त्यांच्याशी बोलताना L for London C

for California होईल !

४) परदेशातील व्यक्तींना फोन करण्याच्या तिथल्या वेळेपमाणे शुभेच्छा द्याव्यात.

५) फोनवर कधीही त्रासलेल्या सुरात बोलू नये. फोनवर संवाद साधत असलेल्या व्यक्तीला तुमच्या अडचणी माहीत असत नाहीत. शिवाय

आपल्या घरगुती अडचणी व्यावसायिक संबंधात आड आणू नयेत.

६) फोनवर बोलताना केव्हाही पेन व कागद हाताशी असावेत. महत्वाचे मुद्दे बोलता बोलता नोंद करून घ्यावेत हे मुद्दे इमेल करून त्याची

खातरजमा करावी.

७) कितीही घाई असेल किंवा राग आलेला असेल तरीही फोन कधीही आदळून ठेवू नये.

मोबाईल फोन वापरताना पाळायचे शिष्टाचार

१) ऑफीसमध्ये मिटींग चालू असताना मोबाईल फोन वाजणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच मिटींग चालू असताना मोबाईलशी चाळा

करत बसू नये.

२) ऑफीसच्या वेळात आपल्या मित्र-मैत्रीणींशी फोनवर ख्यालीखुशालीच्या गप्पा मारू नयेत. सहज फोन करण्याची ऑफीस ही जागा नव्हे.

त्यासाठी ऑफीसच्या वेळेनंतर फोन करण्यास सांगावे. मोबाईल हा प्रामुख्याने अडीअडचणींच्या वेळी, काही तातडीचे काम असल्यास वापरण्याचे

साधन आहे. असा कोणाचा फोन आल्यास सर्वांपासून दूर जाऊन संभाषण करावे. फोनवर मोठमोठ्याने बोलून दुसर्‍याच्या कामात व्यत्यय आणू

नये.

३) वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलू नये असा नियम असला तरी तो नियमितपणे धाब्यावर बसवला जातो. अशा नियमाचे उल्लंघन

करून आपल्याबरोबर दुसर्‍याच्या जीवालाही आपण धोका पोचवतो याची जाण ठेवावी.

— माणिक खेर
बी-७ (पूर्व) वृंदावन सोसायटी, रेंज हिल्स रोड, पुणे ४११०२०

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..